पालघर जिल्हा निर्बंधांतून मुक्त करण्याची मागणी
वसई : पालघर जिल्ह्यचा रुग्ण लागण दर कमी असूनही निर्बंध शिथिल न केल्याबद्दल सर्वत्र नाराजी व्यक्त होत आहे. जिल्ह्यतील रुग्ण संख्याही कमी होत असल्याने आता जिल्ह्यला र्निबधातून वगळा अशी मागणी करण्यात आली आहे.
राज्य शासनाने टाळेबंदीचे निर्बध कमी करताना राज्यातील जिल्ह्यंना सवलती दिल्या आहेत. मात्र ११ जिल्ह्यंमध्ये निर्बंध कायम ठेवत ते कमी करण्याचे सर्वाधिकार जिल्हाधिकारी आणि आयुक्तांना दिले आहे. त्यामध्ये पालघर जिल्ह्यचा देखील समावेश आहे. परंतु पालघर जिल्ह्यचा रुग्ण सकारात्मकतेचा दर तसेच रुग्णसंख्या कमी असून निर्बध शिथिल न केल्याबद्दल व्यापाऱ्यांनी नाराजी व्यक्त केली आहे.
पालघर जिल्ह्यचा सध्याचा साप्ताहिक रुग्ण सकारात्मकतेचा दर हा २.४ टक्के एवढा कमी आहे. मात्र तरी देखील निर्बध कायम ठेवले आहे. यासाठी व्यापारी आणि हॉटेल व्यावसायिकांच्या शिष्टमंडळासमेवत नालसोपारा येथील आमदार क्षितीज ठाकूर यांनी आरोग्यराज्य मंत्री राजेश टोपे यांची भेट घेतली आणि त्यांना वसई विरार तसेच पालघर जिल्ह्यची परिस्थिती समजावून सांगितली. पालघर जिल्हा र्निबधातून वगळा अशी मागणी त्यांनी केली आहे. या प्रकरणी सकारात्मक विचार करण्याचे आश्वसन राजेश टोपे यांनी दिले आहे.