scorecardresearch

रस्ते अपघातात घट

अतिवेगाने वाहने चालविणे, मद्यपान करून वाहने चालविणे,  वाहनावरील नियंत्रण सुटणे, रस्त्यावरील खड्डय़ांची समस्या अशा विविध प्रकारच्या कारणामुळे अपघाताच्या घटना समोर येत असतात.

वर्षभरात ५७० अपघात;  मृत्यूची संख्या १८१

वसई : अतिवेगाने वाहने चालविणे, मद्यपान करून वाहने चालविणे,  वाहनावरील नियंत्रण सुटणे, रस्त्यावरील खड्डय़ांची समस्या अशा विविध प्रकारच्या कारणामुळे अपघाताच्या घटना समोर येत असतात. मीरा भाईंदर व वसई विरारमध्ये वर्षभरात ५७० अपघाताच्या घटना घडल्या आहेत. यात १८१ जणांचा मृत्यू झाला आहे तर ३४८ जण जखमी झाले आहे. मागील वर्षीच्या तुलनेत अपघाताचे प्रमाण ३२ ने तर  मृत्यूचे प्रमाण हे २४ ने घटले आहे.

 वाढत्या शहरीकरणासोबतच वाहनांची संख्या ही बेसुमार वाढली आहे. त्यामुळे वसई विरार व मीरा भाईंदरमधील विविध ठिकाणच्या रस्त्यावर वाहनांची मोठी गर्दी दिसून येत आहे. मात्र काही वाहनचालक हे बेफिकीर पणे वाहने चालवीत असतात तर काही जण अतिघाईने वाहने चालविल्याने सातत्याने अपघाताच्या घटना घडत असतात.या अपघातात काही गंभीर स्वरूपाचेदेखील अपघात असतात यामुळे अनेकांना रस्ते अपघातात आपला जीव गमवावा लागला आहे. वाढते अपघाताचे प्रमाण कमी करण्यासाठी वाहतूक पोलिसांमार्फत नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर कारवाई करणे, जनजागृती करणे अशा विविध उपाययोजना आखल्या जातात. मीरा भाईंदर व वसई विरार विभागात  सन २०२० मध्ये ६०२ अपघाताच्या घटना घडल्या होत्या. त्या वेळी २०५ जणांचा मृत्यू व ३४४ जण जखमी झाले होते. तर सन २०२१ या वर्षांत ५७० अपघात झाले असून यामध्ये  १८१ जणांचा मृत्यू व ३४८ जण जखमी झाले आहेत.मागील वर्षीच्या तुलनेत अपघात व मृत्यू या दोन्हीमध्ये घट झाली आहे. अपघाताचे प्रमाण ३२ ने तर मृतांची संख्या ही २४ ने  कमी झाली आहे. अपघात रोखण्यासाठी व त्याचे प्रमाण कमी करण्यासाठी नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर कारवाई यासह विविध उपाययोजना आखल्या जात आहे. यापुढेही रस्ते अपघाताचे प्रमाण कमी करण्याच्या दृष्टीने ज्या आवश्यक उपाययोजना आहेत त्यावर अधिक भर दिला जाणार असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.

टॅंकरच्या बेदरकारपणाचे अपघात

वसई विरार शहरात सन २०२१ मध्ये रस्त्यावर धावणाऱ्या टॅंकरच्या बेदरकारपणामुळे विविध प्रकारच्या अपघाताच्या घटना समोर आल्या होत्या. यात अनेकांना आपला जीव ही गमवावा लागला होता. विशेषत: करून १९ ते ३० ऑक्टोबर २०२१ या दहा ते बारा दिवसाच्या  कालावधीमध्ये टॅंकरचे चार अपघात घडले  होते यात ६ जणांचा बळी गेला होता तर एक जण जखमी झाला होता. यामध्ये विरार पूर्वेच्या भाटपाडा येथे झालेल्या अपघातात चांदीप गावातील एकाच कुटुंबातील आई, मुलगा, व चिमुकली अशा तीन जणांचा बळी गेल्याची  रस्ते अपघातामधील सर्वात मोठी व धक्कादायक घटना होती.

शहरातील वाहतूक सुरळीत करण्यासाठी आमचे प्रय सुरू आहेत. तसेच अपघात कमी होण्याच्या दृष्टीने ज्या आवश्यक उपाययोजना आहेत त्या सुद्धा पूर्ण करण्याचा प्रय असेल.

— सदानंद दाते, पोलिस आयुक्त मीरा भाईंदर , वसई विरार पोलीस आयुक्तालय

मराठीतील सर्व वसई विरार ( Vasaivirar ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Road accident decrease vehicle drink ysh

ताज्या बातम्या