श्रद्धा वालकर खून प्रकरणामध्ये रोज नवीन माहिती समोर येत आहे. असं असतानाच श्रद्धाचा खून करणाऱ्या आफताब अमीन पूनावालाच्या कुटुंबियांनाही त्यांच्या मुलाने केलेल्या कृत्याची कल्पना होती की काय यासंदर्भातील प्रश्न उपस्थित केले जात आहे. हे प्रश्न उपस्थित करण्यामागील मुख्य कारण म्हणजे एकीकडे आफताबची या प्रकरणामध्ये चौकशी सुरु असतानाच दुसरीकडे आफताबच्या कुटुंबियांनी राहत्या सोसायटीमधील घर सोडून दुसरीकडे स्थलांतर केलं. आफताबला शनिवारी अटक करण्यात आली. मात्र या अटकेच्या १५ दिवस आधी तो मुंबईमधील त्याच्या कुटुंबियांना भेटून गेला होता. आफताबने कुटुंबियांना दुसऱ्या घरामध्ये शिफ्टींगसाठी मदत केली होती अशी माहिती समोर आली आहे.

नक्की वाचा >> Shraddha Murder Case: पोलिसांनी ‘तो’ प्रश्न विचारताच आफताब रडू लागला; ५४ हजार रुपयांमुळे झाला प्रकरणाचा उलगडा

Dr Dharmesh Patel California accident
स्वतःच्या कुटुंबालाच मृत्यूच्या दरीत ढकल्यानंतर भारतीय व्यक्तीला अटक, सुनावणी सुरू असताना समोर आली धक्कादायक माहिती
police reaction on Gurucharan Singh missing
गुरुचरण सिंग बेपत्ता असण्याबद्दल पोलिसांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “सीसीटीव्हीत जे दिसतंय त्यानुसार ते…”
Navneet Rana Answer to Sanjay Raut
‘नाची’, ‘डान्सर’, बबली म्हणणाऱ्या संजय राऊतांना नवनीत राणांचं जशास तसं उत्तर, म्हणाल्या, “मला बोलण्याआधी..”
Sarbajeet singh
सरबजित सिंगच्या मारेकऱ्याची पाकिस्तानात हत्या; मुलगी म्हणते, “हा न्याय…”

आफताब वसईच्या दिवाणमाण येथील युनिक पार्क या परिसरात २० वर्षांपासून आपल्या कुटुंबासह राहत होता. त्याचे वडिल मुंबईत खासगी कंपनीत कामाला होते, तर त्याचा भाऊ नुकताच नोकरीवर लागला होता. त्याच्या शेजाऱ्यांनी माहिती दिली की, आफताबच्या कुटुंबाने केवळ १५ दिवसांपूर्वी आपले घर रिकामे करून ते मीरा रोड परिसरात राहायला गेले होते. त्याच्या दुसऱ्या दिवशी आफताब या ठिकाणी दोन ते तीन तासांसाठी येऊन गेला होता. अशी माहिती गृहसंकुलाच्या सचिवाने दिली. यामुळे आफताबच्या कृत्याची माहिती त्याच्या कुटुंबाला असण्याची शक्यता वर्तवली जात आहे. याबाबत तपास केला जाणार असल्याचे माणिकपूर पोलिसांनी सांगितले.

नक्की वाचा > Shraddha Murder Case: प्रेयसीच्या मृतदेहाचे ३५ तुकडे… इतकं क्रूर कृत्य करणाऱ्या आफताबबद्दल मानसोपचारतज्ज्ञ म्हणतात, “अनेकदा अशा…”

या सोसायटीमधील सदस्यांनी आफताब हा अगदी सामन्यपणे भेट देतो तशाच प्रकारे अटक होण्याच्या १५ दिवसांपूर्वी सोसायटीमध्ये आल्याचं सांगितलं. “त्याने अशाप्रकारचा क्रूर गुन्हा केला असेल असं त्याच्याकडे पाहून वाटत नव्हतं,” असं सोसायटीमधील रहिवाश्यांनी सांगितलं. पूनावाला कुटुंबियांबद्दल सोसायटीमधील कोणीही मागील २० वर्षांच्या कालावधीमध्ये कोणत्याही प्रकारची तक्रार केलेली नाही असंही येथील स्थानिकांनी सांगितलं.

नक्की वाचा >> Shraddha Murder Case: श्रद्धाच्या मृतदेहाचे तुकडे करताना आफताब झालेला जखमी? उपचार करणारे डॉक्टर म्हणाले, “तो मे महिन्यात…”

“जेव्हा आम्ही त्यांना घर सोडून जाण्यासंदर्भात विचारलं तेव्हा आफताबच्या वडिलांनी, माझ्या मुलाला मुंबईत नोकरी लागल्याचं सांगितलं. तसेच मुलाची कंपनी नवीन घराचं भाडं देणार असल्याने आम्ही दुसरीकडे राहायला जात आहोत, असंही ते म्हणाले. त्यांनी रोज मुंबई ते वसई प्रवासादरम्यान येणाऱ्या अडचणींचाही उल्लेख केला,” असं सोसयटीमधील सदस्यांनी प्रसरामाध्यमांना सांगितलं.

नक्की पाहा >> Shraddha Murder Case Photos: प्रेयसीच्या मृतदेहाचे ३५ तुकडे, कबुली जबाब अन् थेट ‘त्या’ जंगलात आफताबबरोबर पोहोचले पोलीस

पूनावाला हे ज्या इमारतीमध्ये राहत होते त्याच इमारतीच्या तिसर्या मजल्यावर राहणारे सोसायटीचे सचिव अब्दुल्ला खान यांनी या कुटुंबाचा कधी त्रास झाला नाही असं म्हटलं आहे. “१५ दिवसांपूर्वी त्यांनी घर रिकामं केलं आणि ते भाड्याने दिलं. ते मुंबईच्या जवळपास कुठेतरी राहायला गेले आहेत. आफताबने मला तो दिल्लीत वास्तव्यास असल्याचं सांगितलं. त्याच्या वागण्यामध्ये काही वेळेपणा दिसला नाही. मात्र या घटनेबद्दल समजल्यानंतर आम्हाला धक्का बसला आहे,” असं खान म्हणाले.

नक्की वाचा >> “मी आजची रात्र याच्याबरोबर राहिले तर…”; प्रियकर आफताबने हत्या करण्यापूर्वी श्रद्धाने मित्राला केला होता Whatsapp मेसेज

वसईत तीन ठिकाणी पती-पत्नी म्हणून भाडय़ाच्या घरात वास्तव्य

आफताब आणि श्रद्धा यांचे २०१८ पासून नातेसंबध होते. २०१९ पासून ते लिव्ह इन रिलेशनमध्ये राहत होते. आफताब आणि श्रद्धा २०१९ मध्ये नायगाव येथील यशवंत प्राईड किणी कॉम्पलेक्स मध्ये पती-पत्नी असल्याचे सांगून भाडय़ाने राहत होते. येथील भाडे करार संपल्याने त्यांनी जुलै २०२० मध्ये वसईच्या एव्हरशाईन परिसरात रिगल अपार्टमेंटमध्ये पुन्हा पती-पत्नी असल्याचे सांगून सदनिका भाडय़ाने घेतली होती. या सदनिकेचा करार ऑगस्ट २०२१ मध्ये संपला या नंतर त्याने वसईत आणखी एका ठिकाणी रूम घेतली आणि त्यानंतर तो दिल्लीत राहायला गेला होता.