वसई:- वसई पश्चिमेच्या आनंदनगर परिसरात पालिकेच्या पथदिव्यांचा खांब अचानकपणे कोसळला. सुदैवाने त्या खांबाच्या खाली उभा असलेला शाळकरी मुलगा अगदी थोडक्यात बचावला आहे. या घटनेची चित्रफीत सीसीटीव्ही मध्ये कैद झाली आहे. शुक्रवारी दुपारच्या सुमारास आनंदनगर परिसरातील नाक्यावर काही जण गप्पा मारत उभे होते. याच दरम्यान शाळा सुटल्यानंतर पार्थ शर्मा हा सात वर्षीय मुलगा घरी जात होता. याच वेळी पथदिव्याचा खांब अचानकपणे खाली कोसळला. पार्थ याच्या खांद्यावर असलेल्या बॅगेमुळे त्याचा जीव वाचला.या घडलेल्या घटनेचा सर्व प्रकार सीसीटीव्ही मध्ये चित्रित झाला आहे.
या घडलेल्या घटनेनंतर आजूबाजूच्या परीसरातील नागरिकांनी पालिकेच्या कारभाराबाबत संताप व्यक्त केला आहे. हा खांब गंजला होता असे असताना पालिकेने याकडे दुर्लक्ष केले असल्याचा आरोप येथील नागरिकांनी केला आहे.
वसई पश्चिमेच्या आनंदनगर परिसरात पालिकेच्या पथदिव्यांचा खांब अचानकपणे कोसळला. सुदैवाने त्या खांबाच्या खाली उभा असलेला शाळकरी मुलगा अगदी थोडक्यात बचावला आहे. या घटनेची चित्रफीत सीसीटीव्ही मध्ये कैद झाली आहे.https://t.co/2jrmCKw8Ui#vasaivirar #Cctv pic.twitter.com/7NxaAQ5xDL
— LoksattaLive (@LoksattaLive) August 23, 2025
या प्रकारानंतर वसई- विरार शहरातील पथदिव्यांच्या खांबाच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे. नागरिकांकडून पालिकेवर निष्काळजीपणाचे आरोप होत असून, तातडीने या खांबांची तपासणी करून दुरुस्ती करण्याची मागणी होत आहे. जुलै महिन्यात महावितरणाचे रोहीत्र पडले होते. तेव्हा जवळ कुणी नसल्याने जिवितहानी टळली होती. वारंवार होणार्या या घटनांमुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे.