वसई- शाळेतील बस मध्ये ४ वर्षांच्या चिमुकलीवर लैंगिक अत्याचार प्रकरणात ठाणे सत्र न्यायालयाने बस चालक आणि मदतनीस या दोघांना दोषी सिध्द केले आहे. चालकाला ५ वर्ष सश्रम कारावास तर मदतनीस महिलेस ८ महिने कारावासाची शिक्षा सुनावली आहे.

ही घटना २०१९ मध्ये मिरा रोड येथील नया नगर पोलीस ठाण्याच्या हद्दीत घडली होती. डेनिस लुईस (६३) हा शाळेच्या बस मध्ये चालक म्हणून काम करायचा होता. ही बस मध्ये जेनोविया मथाईस (३२) ही मदनसीनस म्हणून काम करत होती. मथाईसने बस मध्ये ४ वर्षांच्या मुलीवर लैंगिक अत्याचार केला होता. त्याला पोलिसानी १४ डिसेंबर २०१९ मध्ये अटक केली होती. ही घटना माहिती असून त्याची मदतनीस जेनोविया मथाईस हिने लपवली आणि चालकाला पाठीशी घालण्याचा प्रयत्न केला. तिला नंतर काही दिवसांनी पोलिसांनी अटक केली होती. आरोपी मथाईस अटकेपासून तुरूंगात होता.

हेही वाचा >>>वसई: शालेय बसच्या धडकेत दोन चिमुकल्या बहिणी जखमी; सीसीटीव्ही मध्ये अपघाताचा थरार

या प्रकऱणाचा तपास तत्कालीन पोलीस निरीक्षक कैलास बर्वे यांनी केला होता आणि आरोपीविरोधात भक्कम पुरावे न्यायालयात सादर केले होते. त्या आधारे न्यायाधीश डी.एस.देशमुख यांनी मथाईस पिता-पुत्रीला दोषी सिध्द केले. डेनिस मथाईस याला ५ वर्षे सक्षम कारावा स आणि ५ हजार रुपये दंड ठोठावला. त्याची बसमधील मदतनीस जेनोविया हिला ८ महिने सधा कारावास आणि ५ हजार रुपये दंडाची शिक्षा सुनावली. संध्या म्हात्रे आणि विवेक कुडू यांनी सरकारी अभियोक्ता म्हणून काम पाहिले. पीडित मुलीने न्यायालयात दिलेली साक्ष महत्वाची ठरली आणि त्यामुळे आरोपींवरील आरोप सिध्द होण्यास मदत झाली, असे नया नगर पोलीस ठाण्याचे वरीष्ठ पोलीस निरीक्षक विलास सुपे यांनी सांगितले.