वसई- नालासोपार्‍यातून बेपत्ता असलेल्या १३ वर्षीया मुलीचा मृतदेह निर्मळ येथील खाडीत आढळला आहे. खाडीत बुडून तिचा मृत्यू झाल्याचे पोलिसांनी सांगितले. शुक्रवारी रात्री ही मुलगी गणपती पाहण्यासाठी गेली होती.

निर्मळ येथे राहणारी १३ वर्षीय रिया निशाद ही मुलगी शुक्रवारी रात्री घराजवळील गणेशोत्सव मंडळात जागरणासाठी गेली होती. मात्र ती घरी परतली नव्हती. जागरणानंतर ती मैत्रीणीच्या घरी गेली असेल असे तिच्या कुटुंबियांना वाटले होते. शनिवारी सकाळी देखील ती घरी आली नव्हती त्यामुळे तिच्या कुटुंबियांनी पोलिसात तक्रार दाखल केली आणि तिचा शोध सुरू केला. दरम्यान शनिवारी संध्याकाळी तिचा मृतदेह निर्मळ येथील एकविरा मंदिराच्या मागे असलेल्या खाडीच्या पाण्यात आढळून आला.

हेही वाचा >>>वसई विरार मध्ये पाच दिवसांच्या गणपतीला भक्तीमय वातावरणात निरोप

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

गणेशोत्सव मंडपस्थळापासून खाडी काही अंतरावर आहे. ही मुले तेथे खेळण्यासाठी गेले असताना रिया पाय घसरून पाण्यात पडली आणि तिचा मृत्यू झाला असावा अशी शक्यता नालासोपारा पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक सलीम शेख यांनी वर्तवली. तिच्या सोबत असणार्‍या मुलांनी हा प्रकार न सांगितल्याने ती पडल्याचे समजले नव्हते, असे ते म्हणाले. याप्रकरणी नालासोपारा पोलिसांनी अपमृत्यूची नोंद केली आहे.