scorecardresearch

वसई : जूचंद्र उड्डाणपुलाच्या कामाच्या दरम्यान लोखंडी शीडी कोसळली; दोन कामगार जखमी

सोमवारी सायंकाळी अचानकपणे कामासाठी लावण्यात आलेली वजनदार लोखंडी शीडी व त्यावरील साहित्यवरून थेट मुख्य रहदारी असलेल्या मार्गावर कोसळले. सुदैवाने कोणतेही वाहन मुख्य रस्त्यावर नसल्याने मोठी दुर्घटना टळली

वसई : जूचंद्र उड्डाणपुलाच्या कामाच्या दरम्यान लोखंडी शीडी कोसळली; दोन कामगार जखमी
नायगावात जूचंद्र उड्डाणपुलाच्या कामाच्या दरम्यान लोखंडी शीडी कोसळून दोन कामगार जखमी

नायगाव पूर्वेच्या भागात जूचंद्र उड्डाण पुलाचे काम सुरू असताना रहदारी सुरू असलेल्या मार्गात वजनदार लोखंडी शीडी कोसळल्याची घटना घडली आहे. सोमवारी सायंकाळी सव्वा सातच्या सुमारास ही घटना घडली आहे. यात दोन कामगार जखमी झाले आहेत.

हेही वाचा- नियमांचे सर्रास उल्लंघन; वसई, विरारमध्ये वाहतूक नियमांच्या उल्लंघनाच्या दीड लाख घटना

नायगाव पूर्वेच्या जूचंद्र येथे सार्वजनिक बांधकाम विभागाकडून रेल्वे फाटकावर उड्डाणपूल तयार करण्याचे काम प्रगतीपथावर आहे. सध्या स्थितीत या कामामुळे रस्त्याच्या दोन्ही बाजूने वाहनांना ये जा करण्यासाठी पर्यायी रस्ता उपलब्ध करून दिला आहे. दररोज या मार्गावरून मोठ्या संख्येने वाहनांची वर्दळ सुरू असते. मात्र हे काम सुरू असताना सोमवारी सायंकाळी अचानकपणे कामासाठी लावण्यात आलेली वजनदार लोखंडी शीडी व त्यावरील साहित्यवरून थेट मुख्य रहदारी असलेल्या मार्गावर कोसळले. या घटनेत काम करणारे दोन कामगार जखमी झाले आहेत. या दोन्ही कामगारांना रुग्णालयात उपचारासाठी पाठविण्यात आले आहे. ज्यावेळी ही घटना घडली त्या दरम्यान सुदैवाने कोणतेही वाहन मुख्य रस्त्यावर नसल्याने मोठी दुर्घटना टळली आहे.

हेह वाचा- बंदरावरील उभी बोट जळून खाक; मच्छीमारांचे मोठे नुकसान

असे जरी असले तरी ठेकेदारांच्या निष्काळजीपणामुळे ही घटना घडली असल्याचा आरोप नागरिकांनी केला आहे. काम सुरू असताना त्या ठिकाणी वीज ही लावली जात नाही असेही नागरिकांनी सांगितले आहे. या घटनेनंतर काहीवेळ या मार्गावर वाहतूक कोंडीची समस्या निर्माण झाली होती.

मराठीतील सर्व वसई विरार ( Vasaivirar ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 09-01-2023 at 20:27 IST

संबंधित बातम्या