वसई – अंपगांच्या डब्यात चढलेल्या एका नशेबाजाला हटकल्यानंतर त्याने चक्क सुरक्षा बलाच्या जवानाचा चावा घेतला. त्याला डब्यातून बाहेर काढण्यात सुरक्षा बलाच्या जवानांना मोठी कसरत करावी लागली. वसई रोड रेल्वे स्थानकात रविवारी सकाळी ही घटना घडली.

हेही वाचा – पतंगाच्या मांज्याने चिरला दुचाकीस्वाराचा गळा, वसईच्या मधुबन सिटीमधील घटना

हेही वाचा – वसई, पालघरचे वनक्षेत्र ३५ टक्क्यांनी घटले, भूमाफियांकडून जंगलतोड

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

रविवारी सकाळी दादरवरून डहाणूला जाणारी लोकल निघाली होती. वसई रोड रेल्वे स्थानकात ती सकाळी ९ वाजून ५७ मिनिटांनी पोहोचली. यावेळी फलाटावर रेल्वे सुरक्षा बलाचे (आरपीएफ) भरारी पथक तैनात होते. त्यावेळी एक तरुण अपंगांच्या डब्यात आढळून आला. त्यांनी त्याला खाली उतरण्यास सांगितले. मात्र त्याने नकार देत प्रतिकार केला. यावेळी इतरही जवान मदतीला आले आणि त्यांनी या इसमाला खाली खेचले. मात्र त्याने एका जवानाच्या हाताला आणि पायाला चावा घेतला. सुरक्षा बलाच्या इतर जवानांनी मग त्याला उचलून नेले आणि त्याच्यावर कारवाई केली. हा इसम नशेबाज असल्याची माहिती रेल्वे सुरक्षा बलाने दिली.