वसई : वसई रोड रेल्वे स्थानकात रेल्वे टर्मिनस तयार करण्याचा प्रस्ताव मागील ५ वर्षांपासून प्रलंबित आहे. २०१८ मध्ये तत्कालीन रेल्वेमंत्र्यांनी घोषणा करूनही टर्मिनसचे काम पूर्ण झालेले नाही. त्यामुळे मंत्र्यांच्या घोषणा केवळ पोकळ वल्गना ठरल्या आहेत. टर्मिनस नसल्याने वसईकरांना लांब पल्ल्यांच्या गाडय़ा पकडण्यासाठी मुंबईला जावे लागत आहे.

पश्चिम रेल्वेवरील वसई रोड हे महत्त्वाचे रेल्वे स्थानक आहे. वसई-विरार शहराची लोकसंख्या २५ लाखांहून अधिक आहे. वसईतून मोठय़ा संख्येने प्रवासी बाहेरगावी प्रवास करत असतात. परंतु येथील नागरिकांना बाहेरगावी जाण्यासाठी वांद्रे, कुर्ला, दादर आणि सीएसटी रेल्वे स्थानकात जावे लागते. यामुळे प्रवाशांचे हाल होतात. याबाबत  दोन टप्प्यांत रेल्वे टर्मिनस तयार करण्याचा प्रस्ताव आहे. पहिल्या टप्प्यात काही भाग विकसित केला जाणार आहे. दुसऱ्या टप्प्यात पुर्ण टर्मिनस केले जाणार आहे. परंतु त्यासाठी ३०० हेक्टर जागेची आवश्यकता आहे.  शासनाकडे लगतची जागा हस्तांतरित करण्याबाबत पत्र  देण्यात आले आहे.  प्रस्ताव रेल्वे मंडळाकडे सादर करण्यात आला आहे, अशी माहिती  अधिकाऱ्यांनी दिली.   केवळ प्रस्ताव सादर केला आहे. अद्याप जमीन अधिग्रहण झालेली नाही,  असे आपचे कार्यकर्ते जॉय फरगोस यांनी सांगितले.

Dombivli, poultry farm, Kopar railway station
डोंबिवली जवळील कोपर रेल्वे स्थानकालगत हरितपट्ट्यात कोंबड्यांचा खुराडा, रेल्वे प्रवाशांमध्ये तीव्र नाराजी
Block. Konkan Railway, trains,
कोकण रेल्वेवर ब्लॉक; रेल्वेगाड्यांचा खोळंबा
सागरी किनारा मार्गावर ‘बेस्ट’ची प्रतीक्षाच; स्वतंत्र मार्गिका राखीव असताना अद्याप नियोजन नाही
A young motorman who tried to commit suicide at Bandra station on Western Railway was saved by a motorman Mumbai news
मुंबई: मोटरमनच्या सतर्कतेमुळे प्रवाशाचा वाचला जीव

टर्मिनस का हवे?

पश्चिम रेल्वेमधून दररोज १०३ लांब पल्ल्याच्या गाडय़ांची ये-जा असते. त्यापैकी दररोज ४३ गाडय़ा  मुंबई सेंट्रल स्थानक आणि वांद्रे टर्मिनस स्थानकातून सुटत असतात.   सर्व गाडय़ा वसई रोड रेल्वे स्थानकातून जातात. शिवाय ६० लांब पल्ल्यांच्या गाडय़ा वसई स्थानकात बदलत असतात. त्यामध्ये उत्तरेकडे जाणाऱ्या तसेच मध्ये रेल्वेत जाणाऱ्या रेल्वेचे इंजिन बदलले जात असते. या प्रक्रियेला ५० मिनिटांहून अधिक वेळ लागत असतो.  शिवाय दररोज ४० मालगाडय़ा  जात असतात.  त्यामुळे   टर्मिनस बनवावे अशी अनेक वर्षांपासूनची मागणी होती. 

घोषणा हवेत

वसई रोड रेल्वे स्थानकात टर्मिनस बनविण्याचा पहिला प्रस्ताव २०१३   त्यानंतर २०१७ मध्ये दुसरा प्रस्ताव तयार करण्यात आला. परंतु २०१८ मध्ये तत्कालीन केंद्रीय रेल्वे मंत्री पियूष गोयल यांनी वसई रोड रेल्वे टर्मिनस तयार करण्याची घोषणा केल्यानंतर खऱ्या अर्थाने कामाल गती मिळेल आणि टर्मिनसचे स्वप्न पूर्ण होणार असल्याचे वाटत होते. २०२३ पर्यंत टर्मिनस पूर्ण केले जाणार असल्याचेही जाहीर करण्यात आले होते. दरवर्षी अर्थसंकल्पात तरतूदही करण्यात येत होती.