वसई : वसई विरार महापालिकेने आता शहरात दडलेल्या आपल्याच मालकी जागांचा शोध सुरू केला आहे. यासाठी खासगी कंपनीमार्फत सर्वेक्षण सुरू केले आहे. आता पर्यंत पालिकेने ६८ भूखंड शोधले आहेत. या सर्वेक्षणानंतर पालिकेला किमान १०० एकर जागा मिळविण्याचा प्रयत्न आहे. वसई विरार महापालिका शहराचे एकूण ४२० हेक्टर क्षेत्रफळ आहे. पालिकेच्या मालकिच्या एकूण ८५२ मालमत्ता आहेत. याशिवाय त्यात राज्य शासन, गुरूचरण विभाग, तसेच ग्रामपंचायत आणि नगरपरिषदांच्या मालकिच्या जागा होत्या. पालिकेच्या स्थापनेनंतर ग्रामपंचायत आणि नगरपरिषदांच्या जागा महापालिकेच्या अखत्यारित आल्या होत्या. पण त्यांचे सातबारे उतारे पालिकेच्या नावावर हस्तांतरीत झाले नव्हते. त्यामुळे पालिकेच्या एकूण नेमक्या मालमत्ता किती, त्याचे क्षेत्रफळ किती याची माहिती नव्हती. यातील अनेक भूखंडांवर अतिक्रमणे देखील झाली होती. त्यामुळे या मालमत्तांचा शोध घेण्यासाठी या मालमत्तांचे सर्वेक्षण करण्याचे काम बाह्ययंत्रणेला (आऊटसोर्सिंग) करण्यात आले आहे.

हेही वाचा : नागरिक वाहतूक कोंडीला वैतागले आणि स्वतःच सुरू केली वर्सोवा खाडीवरील नवी मार्गिका

पालिकेच्या मालमत्ता शोधून त्याची मोजणी कऱणे आणि त्यावर कुंपण घालून त्या जागा सुरक्षित करण्यात येत आहेत. आतापर्यंत पालिकेने १८७ जागांचे सर्वेक्षण पूर्ण केले आहे. त्यातील १३२ जागांचे अहवाल प्राप्त झाले आहेत. त्यापैकी ६८ भूखंड हे मोकळे आढळून आले आहेत. मोकळ्या केलेल्या २४ भूखंडांवर कुंपण घालण्यात येत आहे, अशी माहिती पालिकेचे उपायु्कत नानासाहेब कामठे यांनी दिली.

हेही वाचा : वसई : नोव्हेंबर महिन्यातील सर्वोत्कृष्ट तपास पुरस्कार प्रदान, ५ पोलीस अधिकार्‍यांचा आयुक्तांकडून गौरव

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

अनेक भूखंडांवर अतिक्रमण

वसई विरार महापालिकेची स्थापना होण्यापूर्वी ५५ ग्रामपंचायती आणि नंतर ४ नगरपरिषदा होता. २००९ साली ४ नगरपरिषदा आणि ग्रामपंचायती महापालिकांमध्ये विलिन कऱण्यात आल्या. मात्र महापालिकेच्या एकूण जागा (मालमत्ता) किती याची आकेडवारी नव्हती. त्यामुळे अनेक जागांवर अतिक्रमण होऊ लागले होते. मात्र आयुक्त अनिलकुमार पवार यांनी पालिकेच्या मालकीचे भूखंड ताब्यात घेण्यासाठी मालमत्ता विभागाची स्थापना केली होती. उपायुक्त नानासाहेब कामठे यांच्याकडे या विभागाचे काम सोपविण्यात आले आहे. ४२० हेक्टर म्हणजे सुमारे १ हजार ५० एकर एवढी जागा शहरात आहे. आतापर्यंत अशाप्रकारे मालमत्तां सरंक्षित न केल्याने त्यावर अतिक्रमण झाले होते. परंतु आता या उपक्रमामुळे १०० एकर पेक्षा जास्त एकर जागा मिळविण्याचा पालिकेचा प्रयत्न आहे.