वसई : पावसाळ्यात वादळी वाऱ्यात जाहिरात फलक कोसळण्याच्या घटना समोर येत असतात. अशा घटनांवर नियंत्रण मिळविण्यासाठी पालिकेच्या जाहिरात विभागाकडून जाहिरात दारांना लेखापरीक्षण अहवाल सादर करण्याच्या सूचना केल्या आहेत. जे अहवाल सादर करीत नाहीत किंवा जे जाहिरात फलक धोकादायक व विनापरवाना आहेत त्या विरोधात ही कारवाई सुरू केली आहे. आतापर्यंत शंभर हून अधिक जाहिरात फलकांवर कारवाई केली आहे तर ३० गुन्हे दाखल केले आहेत.

वसई विरार शहरात सध्या मोठ्या प्रमाणावर रस्त्याच्या कडेला, इमारतींवर आणि खासगी जागेत लहान मोठे जाहिरात फलक
लावण्यात आले आहेत. या जाहिरात करातून पालिकेला उत्त्पन्न मिळते. जाहिरात दारांनी अर्ज केल्यानंतर सर्व पाहणी करूनच त्यांना फलक लावण्याची परवानगी दिली जाते. यंदाच्या चालू वर्षात सातशेहून अधिक जाहिरात फलकांना परवानगी दिली आहे.
विशेषतः पावसाळ्यात सुटत असलेल्या वादळी वाऱ्यात जाहिरात फलक कोसळण्याच्या घटना समोर येत असतात.अशा घटनांमुळे जिवीतहानी होण्याची शक्यता असते. अशा घटना टाळण्यासाठी महापालिकेने शहरातील जाहीरात दारांना लावण्यात येत असलेल्या जाहिरात फलकांचे संरचनात्मक लेखापरीक्षण करण्याच्या संदर्भात नोटिसा देऊन त्यांना तसा अहवाल सादर करण्यास सांगण्यात येत आहे.तसेच जे जाहिरातदार अहवाल सादर करणार नाहीत त्यांच्यावर कारवाई केली जाईल असा इशारा महापालिकेच्या जाहिरात विभागाने दिला आहे.

धोकादायक व विनापरवाना जाहिरात फलकांवर कारवाई 

शहरात असलेल्या बेकायदा तसेच धोकादायक असलेल्या जाहिरात फलकांवर पालिकेने कारवाई केली आहे. जानेवारी महिन्यांपासून धोकादायक अवस्थेत, वीज रोहित्रा जवळ असलेले व वाहतुकीला अडसर ठरणाऱ्या जाहिरात फलकांच्या विरोधात कारवाई सुरू केली आहे. जानेवारी पासून ते जून या दरम्यान सुमारे शंभरहून अधिक जाहिरात फलकांवर कारवाई करण्यात आली आहे.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

बेकायदा जाहिरात फलक लावणाऱ्यावर गुन्हे 

वसई विरार शहरात नियमबाह्य पध्दतीने जाहिरात फलकलावण्याचे प्रकार वाढीस लागले आहेत. या प्रकारामुळे शहराचे विद्रुपीकरण होत असून अपघात होण्याची शक्यता आहे. असे असतानाही शहरात विविध ठिकाणी अनधिकृत व धोकादायक पद्धतीने जाहिरात फलक उभे केले जात आहेत. मुख्य रस्ते, वळणाचे रस्ते, चौकात जाहिरात फलक लावताना कोणतीच काळजी घेतली जात त्यावर गुन्हे दाखल करण्याची प्रक्रिया ही केली जात आहे. सार्वजनिक मालमत्ता विद्रुपीकरण प्रतिबंध कायद्यांतर्गत आतापर्यंत ३० जणांच्या विरोधात गुन्हे दाखल करण्यात आले आहेत असे महापालिकेचे उपायुक्त (जाहिरात विभाग) अजित मुठे यांनी सांगितले आहे