scorecardresearch

उन्हाळ्यातही वसईकर तहानलेले, सूर्या प्रकल्पातील अतिरिक्त पाणी लांबणीवर

मोठा गाजावाजा करून मार्च अखेर पर्यंत सुर्या प्रकल्पातील १८५ दशलक्ष लिटर अतिरिक्त पाणी आणण्याची घोषणा पोकळ ठरली आहे.

surya water dam
सूर्या प्रकल्पातील अतिरिक्त पाणी लांबणीवर

वसई: मोठा गाजावाजा करून मार्च अखेर पर्यंत सुर्या प्रकल्पातील १८५ दशलक्ष लिटर अतिरिक्त पाणी आणण्याची घोषणा पोकळ ठरली आहे. वितरण व्यवस्थेचे काम पूर्ण न झाल्याने हे पाणी आता लांबणीवर पडले असून ते जूनपर्यंत मिळणार असल्याचे पालिकेने सांगितले आहे. त्यामुळे यंदांच्या उन्हाळ्यात देखील वसईकरांना पाणीटंचाईच्या झळा सोसाव्या लागणार असून पाण्याअभावी नागरिकांचे हाल होणार आहेत.

वसई विरार शहराचे झपाटय़ाने नागरीकरण वाढत आहे. त्यामुळे शहरात पाण्याची मागणी ही प्रचंड वाढली आहे. सध्या पालिकेकडे सुर्या, पेल्हार व उसगाव या तिन्ही धरणातून दररोज २३० दशलक्ष लीटर इतका पाणी पुरवठा केला जातो. मात्र मिळणारे पाणी ही आता अपुरे पडू लागले आहे. त्यामुळे नागरिकांना पाणी टंचाईच्या समस्येला सामोरे जावे लागत आहे.

शहरात पाण्याची समस्या सुटावी यासाठी मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाकडून (एमएमआरडीए) हाती घेण्यात आलेल्या सूर्या प्रादेशिक प्रकल्प ४०३ दशलक्ष लिटर्स पाण्याची योजना आहे. त्यातील वसई विरार शहराला जवळपास १८५ दशलक्ष लीटर इतके पाणी उपलब्ध होणार आहे. एमएमआरडीए मार्फत हे पाणी महामार्गाजवळील काशिद कोपर पर्यंत आणले जाणार आहे. त्यानंतर एमबीआर मधून पाणी पालिकेकडून जलवाहिन्या अंथरून वितरित केले जाणार आहे. मार्च अखेरीसपर्यंत हे पाणी आणले जाणार असल्याचे जाहीर करण्यात आले होते. मात्र वितरण व्यवस्थेचे काम पूर्ण झाले मार्च महिना संपत आला तरीही हे काम अजूनही पूर्ण न झाल्याने १८५ मिळणारे अतिरिक्त पाणी लांबणीवर पडले आहे.

सूर्याप्रकल्पातून मिळणारे १८५ एमएलडी पाणी शहरात आणण्यासाठी जलवाहिन्या अंथरण्याचे काम सुरू आहे. लवकर हे काम पूर्ण करून नागरिकांना पाणी देण्यासाठी प्रय सुरू आहेत.

-तानाजी नरळे, उपायुक्त (पाणीपुरवठा) महापालिका

मराठीतील सर्व वसई विरार बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 30-03-2023 at 00:02 IST

संबंधित बातम्या