वसई: वसई विरार शहरात  विद्युत वाहने खरेदी करण्याकडे नागरिकांचा कल वाढला आहे. ही वाहने चार्जिंग करण्यासाठी वसई विरार शहरात महापालिकेकडून विद्युत वाहनांसाठी चार्जिंग केंद्र उभारण्यात येणार आहेत.यामुळे शहरात विद्युत वाहनांचा वापर वाढून प्रदूषण नियंत्रणासाठी मोठी मदत होईल असा विश्वास पालिकेने व्यक्त केला आहे.

सातत्याने पेट्रोल, डिझेल इंधनाच्या किंमती वाढत आहेत. वाढत्या इंधन दरवाढीमुळे वाहनचालकांचे आर्थिक गणितकोलमडून गेले आहे. इंधन दरवाढीला पर्याय म्हणून आता विद्युत ( इलेक्ट्रिक ) वाहनांकडे पाहिले जात आहे. विद्युत वाहन खरेदीकरण्याकडे नागरिकांचा कल वाढला आहे.विविध कंपन्यांची विद्युत वाहने ही बाजारात दाखल होऊ लागली आहेत. यात दुचाकी, ई ऑटोरिक्षा, चारचाकी अशा वाहनांचा समावेश आहे. वसई विरार यासह पालघर जिल्ह्यात विद्युत वाहनांची वाढू  लागली आहे. मात्र वाहन धारकांना वाहने चार्जिंग करण्यासाठी शहरात एकही चार्जिंग केंद्र नसल्याने आपत्कालीन परिस्थिती वाहने चार्जिंग करायची कुठे असा प्रश्न निर्माण होत असतो.

navi mumbai municipal corporation steps taken to prevent accidents at tandel maidan chowk in seawoods
वाहतूक बेटासह चौकाचे काँक्रीटीकरण; सीवूड्स येथील तांडेल मैदान चौकात अपघातापासून बचावासाठी महापालिकेचे पाऊल
Traffic congestion, Divisional Commissioner office area,
विभागीय आयुक्त कार्यालय परिसरातील वाहतुकीचा बोजवारा, वाहनचालकांना पाच ते दहा किलोमीटरचा वळसा
HC orders Mumbai Municipal Corporation to devise alternative policy for unlicensed hawkers
विनापरवाना फेरीवाल्यांसाठी पर्यायी धोरण आखा, उच्च न्यायालयाचे मुंबई महानगरपालिकेला आदेश
Traffic Routes Altered as Nashik s CBS to Canada Corner Road Undergoes 18 Month Concreting Work
काँक्रिटीकरणासाठी नाशिकमधील आठ रस्ते बंद – सीबीएस- कॅनडा कॉर्नर मार्गावर एकेरी वाहतूक

हेही वाचा >>>मिरा भाईंदर मधील भाजपच्या दोन गटात तुफान हाणामारी; मेहता विरुद्ध व्यास गटाचे मतभेद शिगेला

आता वसई विरार महापालिकेनेही प्रदूषण नियंत्रणाच्या दृष्टीने विद्युत वाहनांची संख्या वाढली पाहिजे यासाठी त्यांच्या साठी शहरात ठीक ठिकाणी चार्जिंग केंद्राची व्यवस्था करण्यात येणार असल्याचे महापालिकेचे आयुक्त अनिलकुमार पवार यांनी सांगितले आहे. २०२४-२५ या अर्थसंकल्पात यासाठी तरतूद करून ही कामे मार्गी लावण्याचा ही मानस पालिकेचा असल्याचे त्यांनी सांगितले आहे.

१) शहरातील प्रदूषण कमी करण्यासाठी पालिकेचे प्रयत्न

इंधनावर चालणाऱ्या वाहनातून काळा धूर बाहेर पडतो.  याशिवाय वाहनांचा आवाज निघतो यामुळे शहरात प्रदूषण निर्माण होते. हे प्रदूषण कमी व्हावे यासाठी पालिकेकडून प्रयत्न केले जात आहेत. त्याचा एक भाग म्हणून शहरात विद्युत वाहनांचा वापर वाढवा यासाठी अशा वाहनधारकांना सुविधा पुरविण्यात येणार आहेत.  या वाहनांमुळे प्रदूषण रोखण्यास मोठी मदत होईल असे पालिकेने सांगितले आहे.

२)  पाच वर्षात आठ हजार विद्युत वाहने

वसई विरार मध्ये विद्युत वाहन खरेदी वाढली आहे. २०१९ ते २०२३ या कालावधीत वसई उपप्रादेशिक परिवहन विभागात सुमारे आठ हजार विद्युत वाहनांची नोंद करण्यात आली आहे.विद्युत दुचाकी ७ हजार १२७  चारचाकी ५२२,  ई रिक्षा १८९, मालवाहतूक ई रिक्षा ५२ व इतर ३५ अशा वाहनांचा समावेश अशी माहिती परिवहन विभागाने दिली आहे.