वसई: विरार रेल्वे स्थानकाजवळील नारंगी फाटक येथे  मालगाडीच्या इंजिनमध्ये बिघाड झाल्याचा प्रकार समोर आला आहे. पश्चिम रेल्वेची विरार डहाणू दरम्यानची डाऊन मार्गांवरील वाहतूक सेवा विस्कळित झाली आहे. शुक्रवारी सायंकाळी सातच्या सुमारास अचानकपणे विरारच्या नारंगी फाटका जवळ मालगाडीत तांत्रिक बिघाड झाला त्यामुळे विरारहून  डहाणूच्या दिशेने जाणाऱ्या रेल्वे वाहतुकीवर याचा परिणाम झाला आहे.

हेही वाचा >>> दुबईत नोकरीच्या आमिषाने तरूणीची फसवणूक;भरोसा कक्षाने केली सुखरूप सुटका

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

या प्रकारामुळे या रेल्वे मार्गावरून जाणाऱ्या फलाईंग राणी, वलसाड एक्स्प्रेस, चर्चगेट विरार डहाणू लोकल या गाड्या थांबविण्यात आल्या आहेत.याचा मोठा फटका प्रवाशांचा बसला आहे. मुंबईहून सुरत कडे जाणाऱ्या फलाईंग राणी, वलसाड एक्स्प्रेस या गाड्या एक ते दोन तास उशिराने धावतील. तर डहाणू कडे जाणारी लोकल ट्रेन ही १ तास उशिराने धावेल अशी माहिती पालघर रेल्वे स्थानकात रेल्वे प्रवाश्यांना देण्यात येत आहे. सद्या फलाईंग राणी या एक्स्प्रेस गाडीला नालासोपारा रेल्वे स्थानकात थांबवून ठेवण्यात आले आहे. गाड्या विलंबाने सुटत असल्याने कामावरून घरी परतणाऱ्या प्रवाशांचे हाल होऊ लागले आहेत. मागील एक ते दीड तासापासून प्रवासी गाडीतच बसून आहेत अशी प्रतिक्रिया प्रवाशांनी दिली आहे.