सह्य़ाद्री रांगेतील बरीच मंदिरे चालुक्य, शिलाहार आणि यादवांच्या काळात बांधली गेली. येथे सहज उपलब्ध असलेल्या काळ्या पाषाणाचा मंदिर बांधकामात उपयोग होणे स्वाभाविक आहे. कोकणातील मंदिरात ‘जांभा’ दगड आढळतो, यालाही हेच कारण आहे. उपरोक्त सत्ताधीशांच्या काळात अंबरनाथचे शिव मंदिर, मुंबईचे वालुकेश्वर, त्याच्या नजीकचे खिडकाळेश्वर आणि सिन्नरचे गोदेश्वर मंदिराची उभारणी झाली. यातील बऱ्याच मंदिरांच्या दर्शनीभागी काळ्या पाषाणाच्या दीपमाळा आढळतात.

जलस्रोतासह जैवविविधता आणि हिरवाईचा अजस्र सह्य़ाद्री गुजरात-महाराष्ट्राच्या सरहद्दीपासून कन्याकुमारीपर्यंत आपली ऐट राखून आहे. औदार्य दाखवणारा हा १६०० किमी लांबीचा आणि १०० किमी रुंदीचा पहाडी प्रदेश पश्चिम घाट म्हणूनही ओळखला जातोय. आता तर तो जागतिक वारसास्थळ यादीत समाविष्ट आहे; पण या अफाट वनवैभवाबरोबर त्या सह्य़ाद्री रांगेतील पाषाण शिल्पवैभवाची मंदिरेही आहेत. त्यांची फारशी दखल घेतलेली नाही. निसर्गवैभवाच्या साथसंगतीत वसलेली ही मंदिरे तशी उपेक्षितच. अजोड कलाकृतीची अज्ञात शिल्पकारांनी निर्माण केलेली मंदिरे म्हणजे सामाजिक, सांस्कृतिक, शैक्षणिक उपक्रमांची केंद्रे असावीत, हा त्यापाठीमागे हेतू होता. या मंदिर उभारणीच्या खूप आधी श्रद्धेपोटी डोंगरगुहेत मूर्तीची स्थापना झाली. नंतर उत्क्रांतीच्या काळात घरसदृश मंदिरे निर्माण होऊन सभोवतालच्या वाढत्या संख्येच्या मागणीनुरूप मंदिरवास्तूत सभा मंडप, मुख्य मंडप, गाभारे, प्रदक्षिणा पथ यांच्या निर्मितीतूनही पाषाण शिल्पे चितारण्यात वास्तुकार वाकबगार होते.

Who holds the keys to the ancient treasures of Tuljabhavani Devi temple
कुलस्वामिनी तुळजाभवानी देवीच्या पुरातन खजिन्याच्या चाव्या कोणाकडे?
Traffic restrictions in Muktidham Kalaram Mandir area on the occasion of Ram Navami
रामनवमीनिमित्त मुक्तीधाम, काळाराम मंदिर परिसरात वाहतुकीवर निर्बंध
Martand Sun Temple
काश्मीरमधल्या मार्तंड सूर्य मंदिराचा होणार जिर्णोद्धार, अयोध्येतील राम मंदिराशी आहे थेट कनेक्शन
dharashiv, tulja bhavani
तुळजाभवानी देवीचे दागिने चोरणारे फरारच! प्रमुख तीन संशयितांची नार्को टेस्ट करा : गंगणे

vs07

सह्य़ाद्रीतील मंदिर व्यवस्थापन संचालित नृत्यकला, संगीत, ध्यानमंदिर, ग्रंथालय, पाठशाळा यांचे प्रशिक्षण-उपक्रम आयोजित करण्याचा प्रयत्न म्हणजे एकसंध समाज घडवताना त्यांच्या अर्थार्जनाबरोबर समाजस्वास्थ संवर्धनाचा प्रयत्न अभिप्रेत होता. सह्य़ाद्री रांगेतील मंदिरांवर स्थानिक, भौगोलिक रचनेनुसार त्या त्या ग्रामसंस्कृतीचे प्रतिबिंब पडले आहे आणि मंदिरवास्तू उभारताना भूमितीशास्त्रासह पर्यावरणाचाही विचार केल्याने ते वास्तुविशारद कसे दूरदृष्टीचे होते हे जाणवते.

सह्य़ाद्री रांगेतील मंदिरवास्तुरचनेत परिसरातील उपलब्ध बांधकाम-साहित्याचा वापर केल्याने त्या प्रदेशाचा बाज पेश करण्यात कलाकार यशस्वी झाले. जोडीला पाषाणमूर्ती घडवतानाही त्यांची अंगभूत कलाकृती नजरेत भरते. ही कलाकृती पाहताना जाणकारांना प्रांतानुरूप बांधकामशैलीचे सादरीकरण म्हणजे खालील प्रकारचे वर्गीकरण आहे.

नागरवास्तू पद्धती : प्राचीन काळच्या हिंदू मंदिर उभारणीतून ही पद्धती दृष्टीस पडते. वास्तुशास्त्र जाणकारांत ही इंडो-आर्यन मंदिर बांधकाम पद्धती म्हणून ओळखली जाते. या मंदिररचनेवरील शिखराचा भाग निमुळता होत जातो. या प्रकारची मंदिरे उत्तर भारत प्रदेशातही आढळतात.

वेसर बांधकाम पद्धती : आपल्या देशातील पश्चिम प्रदेशात वेसर बांधकाम शैलीचा प्रभाव आहे. नागर आणि वेसर पद्धतीच्या मिलाफातून साकारलेली बरीच मंदिरे विंध्य पर्वतापासून कृष्णा नदीच्या परिसरात आढळतात. दोन बांधकाम पद्धतींचा संगम झाल्याने याला मिश्रक पद्धती म्हणूनही संबोधले जाते.

द्रविड बांधकाम शैली : कृष्णा नदी परिसरापासून थेट केरळ प्रदेशापर्यंत या प्रकारच्या बांधकाम शैलीची कलाकृती पूर्वीपासून अस्तित्वात आहे. दक्षिण भूमीशी नाळ जोडलेल्या द्रविड या शब्दावरूनच त्या प्रदेशाची कल्पना येते. या प्रकारच्या मंदिर बांधकामात पाषाण कलाकृती आपले वेगळे स्थान टिकवून आहे. या मंदिरात शिखराकडे मार्गस्थ होण्यासाठी अंतर्गत भागातून मजल्यांचीही उभारणी केली गेली. ‘भूमी’ असे संबोधल्या जाणाऱ्या या मंदिरांचे प्रांगण विस्तृत स्वरूपाचे असते. दक्षिणेकडील या प्रकारच्या मंदिरांना ‘गोपूर’ असेही म्हणतात. सह्य़ाद्रीवरील कोकण भूमीवरच्या काही मंदिरांवर या बांधकामाचा प्रभाव आहेच.

भूमिज वास्तुशैली : नागरवास्तू शैलीशी मिळतीजुळती ही बांधकाम पद्धती. खरे तर या पद्धतीच्या बांधकामाची उपशैलीच म्हणावी लागेल. प्रस्तर आणि विटांची आकर्षक शिखरे असलेली अशा प्रकारची मंदिरे महाराष्ट्रासह मध्य प्रदेशातही आढळतात. एक हजार वर्षांकडे वाटचाल करणाऱ्या अंबरनाथच्या पुरातन शिव मंदिराची उभारणी भूमिज पद्धतीची आहे. महाराष्ट्रात सर्वत्र आढळणारा एक मंदिर वास्तुप्रकार म्हणजे ‘हेमाडपथी’ मंदिरे. या प्रकारची मंदिरे उभारताना वास्तुकारांनी निश्चितच भूमितीचा अभ्यास केल्याचे जाणवते. या प्रकारच्या मंदिर वास्तुशैलीच्या जनकत्वाचा मान हेमाद्री ऊर्फ हेमाडपंत यांच्याकडे जातो, असे म्हणतात. वास्तुशास्त्रात गती-अभिरुची असलेला हेमाडपंत हा देवगिरीच्या यादवांच्या दरबारात मंत्री आणि जाणकार अश्वपारखी म्हणून होता. त्याचप्रमाणे मोडी लिपीची निर्मिती त्यांनीच केल्याचे बोलले जाते. या हेमाडपंतीय बांधकामातील वास्तुउभारणीस सांधेजोड करताना माती-चुना असल्या पकड घेणाऱ्या घटकांचा वापर केला जात नसे. त्याऐवजी वेगवेगळ्या आकारांच्या दगडांना ठरावीक ठिकाणी खोबणी तयार करून हे दगड एकमेकांना घट्टपणे जोडून नियोजित वास्तू उभारली जात असे.

..पण पुरातन वास्तुजाणकार व इतिहासकारांमध्ये हेमाडपंत आणि त्यांनी निर्माण केलेल्या अनोख्या वास्तुशैलीबद्दल मतभिन्नता आहे. त्याचे उत्तम उदाहरण म्हणजे अंबरनाथ येथील शिव मंदिर.

– इतिहासाचा अभ्यासपूर्ण मागोवा घेऊन तर्कशुद्धपणे एखाद्या घटनेकडे बघण्याचा अभाव आपल्याकडे असल्याने कोणत्याही पुरातन मंदिराला ‘हेमाडपंती’ म्हणून संबोधण्याच्या आपल्या समाजाच्या वृत्तीवर प्रकाश टाकताना प्रख्यात ऐतिहासिक, पुरातन इमारतींचे अभ्यासक, भारतीय कमान कलाकार, वास्तुविशारक फिरोज रानडे म्हणताहेत- ‘‘कोकण प्रदेशावर यादवांची राजसत्ता १३व्या शतकाच्या मध्यापासून चौदाव्या शतकाच्या मध्यापर्यंत टिकली. हेमाडपंत हा यादवांचा मुख्य प्रधान. यादव राजेच मुळात शिलाहारानंतर या प्रदेशाचे राज्यकर्ते झाले. तेव्हा त्यांचा प्रधान हेमाडपंतही शिलाहारानंतर झाला असणार हे स्पष्टच आहे. असे असूनही शिलाहार राजाने बांधलेले अंबरनाथचे शिव मंदिर ‘हेमाडपंती’ म्हणून ओळखते जाते.’’

vs08

सह्य़ाद्री रांगेतील बरीच मंदिरे चालुक्य, शिलाहार, यादवांच्या काळात बांधली गेली. सहज उपलब्ध असलेल्या काळ्या पाषाणाचा मंदिर बांधकामात उपयोग होणे स्वाभाविक आहे. कोकणातील मंदिरात जांभा दगड आढळतो त्यालाही हेच कारण आहे..

उपरोक्त सत्ताधीशांच्या काळात अंबरनाथचे शिव मंदिर, मुंबईतील वालुकेश्वर, खिडकाळेश्वर, सिन्नरच्या गोदेश्वर मंदिरांची उभारणी झाली. यातील बऱ्याच मंदिरांच्या दर्शनी भागी मनोरासदृश काळ्या पाषाणाच्या दीपमाळा आढळतात.

भीमाशंकर मंदिर : सह्य़ाद्रीच्या रांगेतील उत्तरेकडील भीमाशंकर हे १३०.७८ चौ.कि.मी. क्षेत्राचे विशाल असे अभयारण्य आहे. भारतातील बारा ज्योतिर्लिगांपैकी ६व्या क्रमांकाचे हे पवित्र असे ‘सदन शिवा’चे स्थान. शिवशंभोना हवीशी वाटणारी नीरव शांतता, नेत्रसुखद वनराई आणि दुर्मीळ पशुपक्ष्यांचा अधिवास येथे जागोजागी आढळतो. येथील मंदिराचा पेशवेकाळात जीर्णोद्धार झाला असला तरी मंदिरातील पिंडी, प्रचंड घंटा, दीपमाळ आणि गाभारा यातून प्राचीन मंदिराचा बाज आणि शिल्पवैभव नजरेत भरणारे आहे. मूळ मंदिराची बांधणी प्राचीन मंदिरसदृश आहे. त्यावर दशावताराच्या कोरीव मूर्ती आहेत.. गाभारा, कर्ममंडप आणि सभामंडप बांधकामात पाषाण आहेच. मंदिर प्रवेशद्वारी दगडी नंदीही आहे. मंदिर सभोवताली गोरखनाथ मठ, ज्ञानकुंड, मोक्षकुंड यांनी मंदिर वास्तूला आणखीनच खुलवले आहे. याच्या बांधकामात अग्निजन्य काळा पाषाण (BASALT), जांभा दगड (LATERITE) आढळतो.

ईश्वरदर्शनाचा साक्षात्कार घडवणाऱ्या निसर्गसमृद्ध सह्य़ाद्री रांगेतील काही मंदिरे आता नामशेष होण्याच्या मार्गावर आहेत आणि जी मंदिरे अजूनही निसर्गशक्तीचे तडाखे सोसत उभी आहेत त्यांचे तरी संवर्धन व्हायला हवे. या मंदिर वास्तूंना फक्त धार्मिक अधिष्ठानच नाही, तर त्यावरची देवदुर्लभ कलाकृती आमचा राष्ट्रीय ठेवाही आहे.