वास्तुरचनेत मॉडर्न किचन हा परवलीचा शब्द बनत चालला आहे. पण केवळ आधुनिक उपकरणांची गर्दी म्हणजे मॉडर्न किचन का, तर नाही. आधुनिक स्वयंपाकघर म्हणजे काय, ते साकारताना कोणत्या गोष्टींचा विचार करावा याविषयी..

अलीकडे कोणत्याही गृहप्रकल्पाची जाहिरात वाचा अथवा ऐका, त्यात हमखास अधोरेखित केली जाणारी संकल्पना म्हणजे मॉडर्न किचनने युक्त. मॉडर्न किचन म्हणजेच आधुनिक सुविधांनी युक्त असे स्वंयपाक घर. स्वंयपाकघर म्हणजे निव्वळ स्वंयपाक करण्याची जागा, असे नसून, तो घराचा एक प्रमुख भाग ठरूलागला आहे. सणावाराच्या निमित्ताने अथवा गेटटूगेदर किंवा पार्टी करणे यासारखे प्रकार हल्ली वरचेवर घरोघरी साजरे होत असतात. अशा वेळी स्वंयपाकघराची रचना सुटसुटीत आणि आधुनिक सुविधांनी युक्त असेल तर यजमान आणि पाहुणे मंडळी दोघांनाही घरात वावरणे सहज सुलभ होते. केवळ पार्टीपुरताच नाही तर एरवीही स्वंयपाकघराची रचना सहज सोपी आणि आवश्यक त्या उपकरणांनी सुसज्ज असेल तर स्वयंपाकघरात काम करणे व तेथील स्वच्छता करणे ही कामे तितकीशी त्रासदायक वाटत नाहीत.

meteor showers, sky, meteor,
उद्यापासून आकाशात उल्कावर्षावाचा विविधरंगी नजारा, सुमारे १२ हजार वर्षांनी…
Loksatta explained What are the reasons for the fall of the rupee against the dollar and what are its consequences
गेल्या १० वर्षांत २८.३ टक्के घसरण… डॉलरपुढे रुपयाची घसरण आणखी कुठपर्यंत? कारणे काय? परिणाम काय?
400 lakh crore market cap milestone of Mumbai Stock Exchange
विश्लेषण : ७५ हजारांचे शिखर… ४०० लाख कोटींचे बाजारभांडवल… शेअर बाजार आणखी किती तेजी दाखवणार?
curiosity about indians performance in paris olympic
अन्वयार्थ : असले ‘अव्वल स्थान’ काय कामाचे?

केवळ आधुनिक उपकरणांची गर्दी केली म्हणजे झाले मॉडर्न किचन, असे नाही. तर त्यासाठी स्वंयपाकघराची रचना व त्यानुसार आवश्यक त्या उपकरणांची योग्य ती मांडणी लक्षात घेणे अधिक महत्त्वाचे ठरते. अलीकडे काळानुसार, मायक्रोवेव्ह ओव्हन, स्टीम ओव्हन्स त्याचबरोबर झिओलाइट तंत्रज्ञानाने युक्त अशा डिश वॉशर्सचा स्वंयपाकघरातील आवश्यक उपकरणे म्हणून विचार केला जातो. यामुळे विजेचा वापरदेखील कमी होतो.

परंतु असे सगळे असूनही, ग्राहक स्वयंपाकघर नियोजनात काही चुका करतात. किचनचा अनुभव आरामदायी व नियोजनबद्ध असेल याची काळजी घेण्यासाठी काही चुका या टाळल्या पाहिजेत. या चुका नेमक्या कोणत्या यावर टाकलेला एक खास दृष्टिक्षेप.

सर्वात प्रथम तुमच्या घराची वास्तुरचना नीट लक्षात घ्या. घराच्या वास्तुरचनेशी सुसंगत अशा कॅबिनेट्सची निवड करा. उदा. तुम्हाला स्वंयपाकघराला क्लासी लुक द्यायचा आहे पण पसाराही नकोय, यासाठी तुम्ही डाउनड्राफ्ट हूड आणि इंडक्शन हॉबचा वापर करू शकतात. डाउनड्राफ्ट हूडचा वापर झाल्यावर स्वंयपाकाच्या ओटय़ावरील कंपार्टमेंटमध्ये बंद करून ठेवता येतो. तसेच इंडक्शन हॉब दिसायला स्वच्छ आणि नीटनेटका तर असतोच, शिवाय ओटय़ावर तो सपाट रहातो. यामुळे पसाऱ्यापासून मुक्त अशा स्वंयपाकघराला एक सुंदर आणि क्लासी लुक प्राप्त होतो.

कॅबिनेटची निवड करताना त्यात काय काय ठेवता येईल यापेक्षा विविध उपकरणे त्यात कोणत्याही प्रकारचे नुकसान न होता कशी राहू शकतील व जागादेखील जास्त व्यापणार नाही याचा अधिक विचार करावा. जसे योग्य त्या प्रकारची डिक्टग प्रक्रिया असलेला डिश वॉशर्स घेतल्यास सांडपाणी चांगल्या तऱ्हेने बाहेर टाकले जाईल.

नियोजनाच्या बाबतीत विचार करताना योग्य जागा, उपकरणांची आवश्यकता, त्याचा आकार आणि जागेचे सौंदर्य या सर्व बाबींचा विचार करणे आवश्यक ठरते. त्यासाठी ग्राहकाला वास्तुरचनातज्ज्ञ ,डिझायनर्स आदी तज्ज्ञांची गरज भासत असते. या मंडळींना त्या त्या उपकरणांची नेमकी माहिती असते. जसे काही ओव्हन्समध्ये टीएफटी डिस्प्ले असतो. जो कार्याचे चित्रात्मक दर्शन घडवितो आणि तो कोणत्याही बाजूने पाहता येतो.

स्वंयपाकघर ही एक कायमस्वरूपी गुंतवणूक आहे. याचे शेल्फ लाइफ साधारण १५ वर्षांचे असते. त्यामुळे त्याची उपयुक्तता लक्षात घेऊन त्यानुसार रंग, अ‍ॅक्सेसरीज्ची निवड करावी. तसेच कुटुंबातील सर्व मंडळींना ही उपकरणे सहजपणे वापरता येतील अशी असावीत. त्याचबरोबर त्यांची मांडणी योग्य त्या उंचीनुसार ठेवावी. त्यामुळे स्वंयपाकघराला एकप्रकारची आकर्षकता प्राप्त होते.

स्वंयपाकघरात योग्य त्या प्रमाणात उजेड येईल अशी प्रकाशयोजना करावी. चुकीची प्रकाशयोजना व्यवस्थितरीत्या उभारलेल्या कॅबिनेटस्चा पोत बिघडविण्यास कारणीभूत ठरूशकते. उदा. स्वंयपाकघराला तुम्ही मधासारखा चॉकलेटी रंग दिला असेल तर चुकीच्या प्रकाशयोजनेमुळे स्वंयपाकघर गडद तपकिरी रंगाच्या शेडमध्ये येऊ शकते आणि ते निस्तेज दिसू शकते.

रिमॉडेिलग म्हणजे केवळ उपकरणे बदलणे आणि दुरुस्ती करणे इतकाच त्याचा अर्थ नाही. तर स्वंयपाकघराचा संपूर्ण आराखडा बदलणे त्यात अपेक्षित असते. हल्ली अनेक घरांमध्ये स्वयंपाकघराला पारंपरिक रचनेऐवजी आधुनिक स्वरूपाच्या रचनेमध्ये बदलण्याचा ट्रेण्ड वाढू लागला आहे. त्यामुळे डायिनग टेबलची जागा हळूहळू स्वयंपाकघरात जाऊ लागली आहे. जेणेकरून, घरातील पार्टी अथवा कौटुंबिक जेवण, इ. सारख्या गोष्टी सहज, सुलभ पद्धतीने स्वयंपाकघरात मांडता येतात.

शेवटी, तुमच्या गरजांशी कधीही तडजोड करू नका. उत्तम कार्यक्षमता, साधी वैशिष्टय़े आणि उत्तम कामगिरी देणारी उपकरणे निवडा. अनेक नामवंत कंपन्यांची विविध प्रकारची वैशिष्टय़े असलेली परंतु सोप्या पद्धतीने कार्यरत असलेली उपकरणांची मालिका (अप्लायन्सेस सीरिज्) बाजारात उपलब्ध असतात. त्यांचा वापर करून तुम्ही निरोगी व आरोग्यदायी जीवनशैलीचा अवलंब करू शकता. जसे स्टीम ओव्हनसारख्या उपकरणाचा वापर करून ढोकळा किंवा स्टीम फिश यांसारखे पदार्थ कमीत कमी विजेचा वापर करून घरच्या घरी सहजपणे करू शकतात. किंवा ओव्हनमधील कुलिंगफॅनमुळे सुंगधमिश्रित होणार नाहीत आणि गरम हवेचे योग्यप्रकारे व्यवस्थापन होऊन त्याचे वितरण सर्व विभांगांमध्ये होईल याची काळजी घेतली जाते. त्यामुळे आपण एकाच वेळी अनेक पदार्थ बनवू शकतो. त्यामुळे वेळेचे व्यवस्थापन देखील साधले जाते.

योग्य विचार, नियोजन आणि अमंलबजावणी यांचा नेमका विचार करून स्वयंपाकघराची रचना केल्यास ते उत्तम तर होईलच, पण योग्य उपकरणे आणि कॅबिनेटस् यांच्या वापरामुळे ते अधिक आकर्षक व आधुनिक बनेल यात शंकाच नाही.

(लेखिका बीएसएच हाऊसहोल्ड अल्पाएन्सेसच्या सीईओ आहेत.)

गुंजन श्रीवास्तवा

शब्दांकन : सुचित्रा प्रभुणे