भारतातील अग्रगण्य फ्लोअरिंग कंपनी निटकोने कांजूरमार्ग येथील ‘निटको वॉल स्टुडिओ’ या आपल्या नवीन शोरूममध्ये आधुनिक, ग्राफीक, रंगीबेरंगी आणि फॅशनेबल वॉल टाइल्स कलेक्शन आणले आहे. वॉल टाइल्सचे भारतातील हे पहिलेच कलेक्शन आहे. नवी एचडी डिजिटल वॉल टाइल्स चकचकीत आणि त्यावर सिक्स कलर प्रिझ्म तंत्रज्ञानाने पिंट्रिंग केलेले असते. या फ्लोअरिंग अतिशय टिकाऊ असून त्यावर डाग पडत नाहीत. या टाइल्स आकर्षक असल्याने तुमच्या घराला अभिजात आणि दिमाखदार रूप मिळते. ३०० बाय ४५० मिमी (बेस टाइल्स), ३०० बाय ४५० मिमी (डेकॉर), ३०० बाय ६०० मिमी (बेस टाइल्स), ३०० बाय ६०० मिमी (डेकॉर) आणि ३०० बाय ९०० मिमी व ३०० बाय ३०० मिमी  (मॅचिंग फ्लोअर)मध्ये उपलब्ध असलेल्या या टाइल्सची किंमत ६० रुपये ते १५३ रुपये प्रति चौरस फूट असून त्या स्टायलिश घराकरिता सुयोग्य पर्याय आहेत. या शोरूममध्ये खास रूम डेकॉर डिस्प्ले संकल्पना उपलब्ध असल्याने तुम्ही निवडलेल्या टाइल्स तुमच्या घरात कशा दिसतील याचीही कल्पना येते.  तुमचा दिवाणखाना, बाथरूम आणि किचन मूर्त करणाऱ्या आकर्षक रूम डेकॉरमधून ही उत्पादने वापरली गेल्यास कशी दिसतील, याचे कल्पनाचित्र पाहाता येईल.