रजनी अशोक देवधर

प्राचीन भारतातील महोबा येथील चंडेल  राजघराण्यातील राजे किरत राय यांची मुलगी राणी  दुर्गावती  इ.स. १५२४ मध्ये दुर्गाष्टमीच्या दिवशी कालंजर किल्ल्यावर जन्मली. नावाप्रमाणेच ही  दुर्गा दुष्टांच्या संहारासाठी शौर्याच्या तेजाने तळपली. हिचा विवाह गोंडवानामधील गोंड राजघराण्यातील राजे संग्राम शाह यांचा मुलगा दलपत शाह यांच्याशी झाला. यांचा मुलगा राजपुत्र वीर नारायण लहान असतानाच पती दलपत शाह यांचा मृत्यू झाल्याने राज्याची सूत्रे राणी दुर्गावतीकडे आली व ती धुरा राणीने युद्धातील शौर्याने व राजनीतीच्या कौशल्याने पेलली. आक्रमक मोगल सुलतानांच्या काळात राणी दुर्गावतीने सरदार असफ खान याला दोनदा युद्धात हरवून राज्याचे रक्षण केले. बलाढय़ सम्राट अकबरालाही न घाबरणारी, स्वत:च्या राज्याचे  शौर्याने रक्षण करणारी ही दुर्गावती साक्षात दुर्गेचा अवतार म्हणून प्रसिद्ध आहे. इ.स.  १५६४ मध्ये युद्ध करत असताना युद्धभूमीवर घायाळ झालेल्या राणीने पुत्र वीर नारायण धारातीर्थी पडल्यावरदेखील शोक न करता युद्ध सुरूच ठेवले. युद्धात शत्रुपक्षाच्या बाणाने घायाळ झाल्यावर  स्वत: खंजीर काढून स्वत:ला संपवून वीरमरण पत्करले.

bhau rangari ganpati temple fire marathi news
भाऊ रंगारी गणपती मंदिराजवळील जुन्या लाकडी वाड्याला आग
actress raveena tondon marathi news
‘आर्ची’च्या मनमोहक अदांमुळे रविना टंडनही घायाळ! अनेक सेलिब्रिटींना…
Martand Sun Temple
काश्मीरमधल्या मार्तंड सूर्य मंदिराचा होणार जिर्णोद्धार, अयोध्येतील राम मंदिराशी आहे थेट कनेक्शन
dombivli marathi news, pedestrian bridge on railway line
डोंबिवलीतील गणपती मंदिराजवळील रेल्वे मार्गावरील पादचारी पूल धोकादायक; १ एप्रिलपासून डोंबिवली पूर्व-पश्चिमेकडे जाण्याचा मार्ग बंद

प्राचीन भारतामधील शौर्य तेजाने तळपणारी सौदामिनी गोंड राज घराण्यातील राणी दुर्गावती. मध्य प्रदेशातील जबलपूरमधला मदन महाल किल्ला राणी दुर्गावतीच्या गोंडवाना मधला. गोंड राजे मदन शाह यांनी बाराव्या शतकात बांधला. नर्मदा नदीकाठचा हा सुपीक प्रदेश गोंडवाना मधला त्यावर मध्ये हा किल्ला पुढे गोंड राणी दुर्गावतीसाठी राज्य करत असताना आजूबाजूच्या मुलखावर  टेहळणी करण्यासाठी लष्करी ठाणे म्हणून अतिशय महत्त्वाचा होता. गोंडवनातील हे लष्करी ठाणे मदन महल बांधताना राजे मदन शाह यांनी तेथील प्रदेशाचा अभ्यास करून खडकांच्या नैसर्गिक रचनेचा पुरेपूर वापर करून घेतला आहे. किल्ल्याचे भग्न अवशेष त्याची साक्ष देतात. घोडय़ांसाठी तबेले, पाण्यासाठी जलाशय, धान्य कोठार, युद्धसामगीसाठी कोठारे, राहण्यासाठी  घरे, पुढील योजना ठरविण्यासाठी युद्धकक्ष आदी सारे बांधताना आजूबाजूच्या मुलखावर टेहेळणीसाठी डोंगरावरील नैसर्गिक प्रचंड मोठय़ा शिळेचा वापर करत त्यावर केलेले बांधकाम पाहून राजा मदन शाह यांच्यामधील दूरदृष्टीचे दर्शन होते. हा किल्ला गोंडवनातील गोंड राजांच्या राजधानीचा नव्हता. राज्याचे रक्षण करणाऱ्या सेनेचे लष्करी ठाणे यासाठी त्याला आगळे महत्त्व होते.

मदन महाल किल्ला बांधला तो डोंगर त्यावरील खडक, शिळा यांना भौगोलिक आगळे महत्त्व आहे. पृथ्वीच्या पोटातील खदखदत्या लाव्हा रसापासून पासून भूपृष्ठावर  होणारे खडक, जमीन, माती यांचा पोत वेगवेगळ्या भूभागात वेगळा असतो. नर्मदा नदी, विंध्य पर्वत रांगांमधील हा भूप्रदेश तेथल्या आगळ्यावेगळ्या खडकांमुळे प्रसिद्ध आहे. संगमरवर, ग्रॅनाईट खडकाची नैसर्गिक शिल्प असलेला हा प्रदेश. तेथे निसर्गाच्या उलथापालथीवर प्रकाश टाकणाऱ्या काही विस्मयकारी गोष्टी आहेत.

मदन महाल किल्ल्यावर जाताना त्या डोंगरावर असलेल्या एकावर एक ठेवल्यासारख्या न पडणाऱ्या महाकाय शिळा ( बॅलन्सिंग रॉक), तसेच  महाकाय शिळांनी केलेले नैसर्गिक गोलाकार छत्र पाहण्यासारखे आहे. मानवी  इतिहास व भूपृष्ठाखालील लाव्हा आणि भौगोलिक घडामोडी यांचा साक्षीदार जणू मदन महाल किल्ला नर्मदेच्या  खोऱ्यातील गोंदवनातील प्राचीन वास्तुशिल्पीने इ.स. बाराव्या शतकात घडविलेले आगळे शिल्प आहे. किल्ल्यावरच्या दालनातील कमानींवरचे कोरीव काम सौंदर्य, वीरश्री यांचा मिलाफ असलेली तत्कालीन वास्तुशिल्पकला नैसर्गिक ऊन, पाऊस, वारा यांचे तडाखे सोसत माणसांच्या पुढच्या पिढय़ांसाठी  शिल्लक राहिलेली प्रेरणादायी आहे.

deodharrajani@gmail.com