अत्याधुनिक किचन आणि किचन ट्रॉलीज यांचं एक समीकरणच बनलं आहे. हल्ली किचन ट्रॉलीज शिवाय किचन अपूर्णच वाटतं. कुकींगी आवड असणाऱ्या व्यक्तींला किचन अगदी परिपूर्ण असावं लागतं. निरनिराळ्या वस्तूंसाठी किचनमध्ये पुरेशी जागा असणं त्यासाठी आवश्यक असतं. त्यासाठी एकतर किचन आकराने मोठं असावं अथवा आहे त्या आकाराच्या किचनमध्ये प्रत्येक इंच न इंच वापरात आणला पाहिजे. उपलब्ध जागेचा जास्तित-जास्त उपयोग व वापर करण्याच्या संकल्पनेतून किचन सध्यस्थितीत उपलब्ध असणाऱ्या किचनच्या आकारमानापेक्षा निश्चितच मोठे वापरायला मिळाले पाहिजे. आणि नेमके तेच सर्वात लहान आकारमानाचे असते. काही घरातल्या किचनमध्ये तर एकावेळेस एकच व्यक्ती काम करू शकेल एवढाच किचनचा साईज असतो.
किचन ट्रॉलीज ही अशी एक सविधा आहे की ज्या मुळे किचनमधील सर्व सामान, वस्तू, अन्न-धान्न्य, भाज्या सर्वकाही अगदी एकत्रितपणे व्यवस्थित ठेवता येतं. हवं ते हवं तेव्हा वापरणं जास्त सोपं जातं. या किचन ट्रॉलीजमुळे किचनमध्ये काम करताना आपला वेळ व एनर्जी दोन्हीही आपण वाचवू शकतो. या ट्रॉलीज मुव्हेबल असतात. त्यामुळे त्या वापरताना वस्तू उचलण्याची किंवा एका जागेवरून दुसरीकडे नेण्यासाठी फार श्रम पडत नाहीत.
यात प्रामुख्याने दोन प्रकार वापरले जातात पैकी एक फ्लोअर माऊंटे तर दुसरा माऊंटेड ऑन टेलिस्कोपीक चॅनल्स, फ्लोअर माऊंटेड ट्रॉलीजमध्ये विशेषत: अन्य-धान्य, तेलाची बरणी, भाजी-पाला इत्यादी ठेवण्याची सोय असते तर ट्रॉलीज माऊंटेड ऑन टेलिस्कोपीक चॅनल्समध्ये लहान आकारचे किचन वेअर्स, ग्लासेस, बाऊल्स, डीशेस इत्यादी ठेवण्याची व्यवस्था करावी लागते. यापैकी फ्लोअर माऊंटेड ट्रॉलीज मार्केटमध्ये रेडीमेड सुद्धा मिळू शकतात. परंतू ट्रॉवर टाईप ट्रॉलीज मात्र उपलब्ध जागेप्रमाणे वापराप्रमाणे, गरजेप्रमाणे हव्या त्या आकारात डीझाइनमध्ये बनवून घेता येऊ शकतात. या किचन ट्रॉलीज गरज पडल्यास एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी घेऊन जाऊन वापरता येऊ शकतात. किचन ट्रॉलीजमुळे किचन क्रॉकरी ठेवण्यासाठी भरपूर जागा उपलब्ध होते. हा एक अत्यंत उत्तम असा किचन स्टोअरजचा पर्याय असून अतिशय लहान आकाराच्या ‘किचनमध्ये देखील भरपूर सामान ठेवता येते.
यामध्ये एखादी सव्‍‌र्हिस ट्रॉली देखील बनवून घेता येऊ शकते. किचनमधील वस्तू इतर रूम्समध्ये घेऊन अथवा वाहून नेणे यामुळे इतक्या होऊ शकतं. या सव्‍‌र्हिस ट्रॉली देखील बाजारात रेडीमेड मिळू शकतात. आपल्या गरजेनुसार आणि एकूणच आपल्या घराच्या इंटिरिअर डिझाइनला शोभतील अशा आपण घेऊ शकतो. यामध्ये बाजारात असंख्य व्हरायटीज उपलब्ध आहेत.
बहुसंख्य ट्रॉलीज या पूर्वी लाकडामध्ये बनवल्या जात असत. हल्ली स्टेनलेस स्टील अ‍ॅल्युमिनियम, मेटल, अ‍ॅक्रेलिक, काच इत्यादी विविध मटेरिअलच्या वापरातून बनवल्या जातात. आपल्या बजेटनुसार वरीलपैकी एखादं मटेरिअल निश्चित करून गरजेनुसार व उपलब्ध जागेच्या आकारमानानुसार किचन ट्रॉलीज बनवता येऊ शकतील. मूळ किंमतीच्या प्रमाणात त्याचा देखभालीचा सर्व देखील विचारात घेणं आवश्यक आहे.
काहीवेळा आपल्याकडे अगोदरपासून असणाऱ्या किचन युनिटच्या मूळ डिझाइनचा विचार करून त्याला साजेशा किचन ट्रॉलीज बनवल्या गेल्या पाहिजेत. तसेच किचनच्या व एकूणच घराच्या आकारमानाला शोभतील तसेच त्या एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी नेणे शक्य होतील अशाच आकाराच्या असल्या पाहिजेत. गरजेपेक्षा मोठय़ा ट्रॉलीज बनवल्या तर घरातली वावरण्याची मोकळी जागा कमी होईल तसेच त्या बोजड, अवजड वाटायला लागतील.
किचन ट्रॉलीजच्या डिझाइनशी संबंधीत निर्णय घेताना किचनच्या अथवा संपूर्ण घराच्या, रंग,टेकशचर थीम, साईजेस यांची सांगड किचन ट्रॉलीजशी घातली पाहिजे. यामुळे युनिफॉर्मिटी तर येईलच परंतू वापर करताना देखील हे सर्वकाही महत्त्वाचं ठरेल.
व्हेजिटेबल्स ट्रॉली देखील किचनमध्ये अत्यंत उपयुक्त सुविधा असून आपल्याला लागणाऱ्या दैनंदिन स्वयंपाकातील भाज्या त्या नीट तर ठेवता येतातच शिवाय त्या ओपन टाईप असल्यामुळे वापरण्यासाठी योग्य ठरतात. यात निरनिराळ्या कप्प्यांमध्ये, फळे, फळ भाज्या, पालेभाज्या, स्वतंत्रपणे नीट स्वच्छ करून ठेवता येतात आणि लागेल तशी, लागेल तेव्हा त्यातील भाजी – फळे घेता येतात.
ड्रॉवर टाईप ट्रॉलीजमध्ये निरनिराळे कप्पे करून त्यांत लहान-लहान चमच्यांपासून, प्लेटस्, बाऊल्स, किचनवेअर्स, कपबश्या इत्यादी सर्वकाही व्यवस्थीत ठेवता येतं. ज्यावेळेस एखाद्या वस्तूची गरज असेल त्यावेळेस केवळ ती वस्तू ठेवलेली ट्रॉली बाहेर काढून काम भागते.
ही खरं तर एकप्रकारे गुंतवणूकच म्हणावी लागेल. कारण या किचन ट्रॉलीजमुळे मिळणारे फायदेच अनेक आहेत. अर्थातच त्यासाठी किचनचं व्यवस्थित डिझाइनिंग होणं अधिक गरजेचं असतं. इंटिरिअर डिझाइनरचा किचन डिझाइनींग करताना कस लागत असतो. कारण त्याला त्या किचनमध्ये ठेवल्या व वापरल्या जाणाऱ्या प्रत्येक लहान – मोठय़ा वस्तूंच्या साईजेस बरोबरच त्या वापरल्या जाण्याचं प्रमाण देखील माहिती करून घ्यावं लागतं. या ट्रॉलीजचं डिझाइनींग करताना ते प्रॅक्टीकली किती वर्केबल होईल हे बघणं फार महत्त्वाचं ठरतं.
फ्लोअर माऊंटेड ट्रॉलीजपैकी एखाद्या ट्रॉलीचा उपयोग ट्रॉलीच्या ट्रॉपवर, भाज्या चिरण्यासाठी करता येऊ शकतो त्यासाठी अशा ट्रॉलीला टॉपसाठी ग्रॅनाईट अथवा मार्बल सारखे स्टोन्स अथवा स्टेनलेस स्टील टॉप वापरावा. स्वच्छतेच्या तसेच टिकावू पणाच्या दृष्टीकोनातून ते उपयोगाचे ठरतं.
गॅस सिलिंडरसाठी देखील फ्लोअर माऊंटेड ट्रॉलीज एक अथवा दोन गरजेनुसार बनवून घ्यावा लागतात. या ट्रॉलीज बनवत असताना ओटय़ाखालील एकूण उपलब्ध जागा, उंची व सिलिंडर तसेच ट्रॉली यांची एकत्रितपणे उंची माहिती करून घेणे आवश्यक असते.
सव्‍‌र्हिस ट्रॉलीला स्वतंत्र ड्रॉवर्स दिले तर त्यातच लहान लहान वस्तू जसे, चमचे, सुरी, वाटय़ा इत्यादी ठेवता येतात. आणि एखादा पदार्थ सव्‍‌र्ह करताना या ट्रॉलीतील चमचे, बाऊल्स वगैरे देखील सव्‍‌र्ह करता येऊ शकतं.
ड्रॉवर्स टाईप ट्रॉलीज की ज्या माऊंटेड ऑन टेलिस्कोपिक चॅनेल्स वर बसविलेल्या असतात, त्या अधिक करून किचन प्लॅटफॉर्मच्या खालील जागेत बसविल्या जातात. यासाठी ओटय़ाखालील जागा मोकली असणं आवश्यक असतं. मेटल फ्रेमच्या साह्य़ाने तयार केल्या वर फिक्सींग केलं जातं. यात तयार केलं जाणारे ड्रॉवर्स पुष्कळदा मेटल बास्केटचा वापर करून केलेले असतात. तयार झालेल्या संपूर्ण स्ट्रक्चरला एकतर पावडर कोटिंग केलं जातं अथवा पि.व्ही.सी. कोटिंग करतात. यात मेटल ऐवजी पूर्णत: स्टेनलेस स्टील देखील वापरता येऊ शकतं. स्टेनलेस स्टीलचा वापर केल्यास पुढील काळातील मेंटेनन्स शून्य असतो.
या ट्रॉलीज मूव्हेबल, रोटेटींग, स्लायडींग, पुश-पुल टाईप अशा विविध प्रकारात बनवता येऊ शकतात. मूव्हेबल ट्रॉलीजचा उपयोग प्रामुख्याने सव्‍‌र्हिस ट्रॉली किंवा व्हेजिटेबल – फ्रूट ट्रॉली म्हणून केला जातो. रोटेटींग ट्रॉलीज अधिक करून कॉर्नरपीस म्हणून वापरल्या जातात. कोणत्याही कॉर्नरला बसवली जाणारी ट्रॉली अनेकदा रोटेटींग स्वरुपाची असते. स्लायडींग ट्रॉली काहीवेळा ज्या ठिकाणी एखादा कोपऱ्यापर्यंत आपला हात पोहोचणार नाही किंवा एका ट्रॉलीच्या मागे दुसरी ट्रॉली ठेवली जाणार असेल अशा वेळी स्लायडींग ट्रॉली वापरता येते. पुरा-पुल टाईप ट्रॉली म्हणजेच ड्रॉवर्स टाईप ट्रॉली.
या ट्रॉलीजना दर्शनी भागावर फ्लायवूड, लॅमिनेट श्री लॅमिनेटेड बोर्ड, न्यू – वूड, पार्टिकल बोर्ड, मेटल, स्टेनलेस स्टील, फायबर बोर्ड यापैकी एखादं मटेरिअल निवडून ते वापरायचं. याच्या निवडीसाठी सभोवतालच्या इंटिरिअर डिझाइनींगचा अभ्या होणं महत्त्वाचं आहे. जर काही नवं-जुनं एकत्र आणायचं झालं तर त्यांचा परस्परांशी संबंध राहणं, साधम्र्य असणं आवश्यक असतं.
प्राथमिक दृष्टय़ा विचार करता मुव्हेबल व फीक्झ्ड असे दोन प्रकार या ट्रॉलीजमध्ये उपलब्ध होऊ शकतात. पैकी मुव्हेबल ट्रॉलीज देखील काहीवेळा रेडीमेड स्वरुपात बाजारात उपलब्ध होऊ शकतात. मात्र फीक्स्ड ट्रॉलीज या ऑर्डर देऊन आपल्याला हव्या तशा बनवून घेता येऊ शकतात. अर्थात मुव्हेबल देखील आपण आपल्याला हव्या तशा ऑर्डर देऊन बनवून घेऊ शकतो.
साधारणपणे २० व्या शतकात प्रगतीपथावर असलेल्या इंटिरिअर डिझाइनींग या क्षेत्राने उत्तरोत्तर प्रगती  केली आणि त्या प्रगतीचंच किचन ट्रॉलीज हे एक द्योतक मानता येईल.
सध्याच्या २१ व्या शतकात बिल्डर्सकडून तयार होणाऱ्या घरांमध्ये तर किचनसाठी ट्रॉलीजची सुविधा अगोदरपासूनच उपलब्ध केलेली असल्याचं दिसून येतं. म्हणजेच किचन ट्रॉलीज हा एक इंटिरिअर डिझाइनमधील अविभाज्य घटक आहे. ती काळजी गरज– आहे
दिवसेंदिवस वाढत जाणाऱ्या घरांच्या जागेच्या किंमती व त्यामुळेच कमी कमी होत गेलेले जागांचं आकारमान यामुळे एकूणच इंटिरिअर डिझाइनींग ही काळाची गरज आहे. घरांच्या बाबतीत किचन इंटिरिअर हे नेहमीच चॅलेंजींग असतं. यातच किचन ट्रॉलीजचं डिझाइनींग करताना त्या डिझाइनचं खरं कसब त्यात दिसून येतं.
(प्राचार्य, महावीर इन्स्टिटय़ूट पुणे)