प्राची पाठक

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

सगळ्या प्रवासी बॅगांचे डिझाइन कसे असते यासाठी त्या बागा समोर ठेवून नीट बघा. त्यांना कुठे आणि कसे कप्पे शिवलेले असतात. कोणते भाग आत असतात, कोणते बाहेर ते बघा. बाहेरच्या कप्प्यांना जाडी दिलेली असेल तर जास्त सामान बसते. तसे नसेल तर सपाट उभ्या-आडव्या वस्तू त्यात नीट बसतात. बॅग हातात उचलायची आहे की खांद्यावर घ्यायची की पाठीला लावायची, यानुसारसुद्धा बॅगांचे डिझाइन्स आणि सोयी बदलतात. हातात उचलायच्या बॅगा, खांद्याला लावायच्या बॅगा यांना आजकाल व्हील्स येतात. पण ते सेटिंग्स तुम्ही कसेही वापरले- जर ते कितीही चांगले उत्पादन असेल तर तुटणारच. चाकांच्या बॅगांना ओढण्यासाठी जे आत फोल्ड होणारे मेटल अथवा प्लास्टिकचे भाग असतात, त्यांची रचना नीट समजून घेतली, त्यांच्या रचनेनुसार त्यांना हाताळले तर ते भरपूर टिकतात. हे भाग विशिष्ट अशा उत्पादनासाठी विशिष्ट प्रकारे बनवलेले असल्याने ते दुरुस्त करणे अवघड असते. रिप्लेस करणेसुद्धा जिकिरीचे, खर्चाचे असते. त्यांचे फोल्ड होणारे जॉइंट्स तसे तकलादू असतात. तिथे त्यांना नीट आधार देऊन अथवा काळजीपूर्वक ओढावे लागते. एवढय़ा तेवढय़ा कारणाने बॅगा खराब झाल्या तर हळूहळू वापरातून बाजूला जातात. वापरातून बाजूला पडलेल्या बॅगा ‘करून आणू एकदा,’ असं करत करत अडगळीत जातात. कारण, ‘करून आणू एकदा’ हा मुहूर्त उजाडतच नाही चटकन. तोवर नवीन खरेदी होऊन जाते. कारण मन आपल्याला सांगत असतं, आपल्याकडे काही एक गोष्ट धड नसते! नवीन गोष्ट आली की आधीची माळ्यावर आणखीन मागे लोटली जाते.

मराठीतील सर्व लेख बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Size and lock of travel bag part
First published on: 15-12-2018 at 01:06 IST