इन्फ्लुएन्सर्सच्या जगातच्या २४ व्या भागात आपण भेटणार आहोत अभिनेत्री ते युट्युबर असा प्रवास करणाऱ्या उर्मिला निंबाळकर हिला तसेच आपल्याबरोबर गप्पा मारण्यासाठी आज सुकीर्त जी या चॅनेलचा सुकीर्त गुमास्ते सुद्धा असणार आहे. या जोडप्याने मराठी कन्टेन्टच्या जगात ट्रॅव्हल, लाइफस्टाइल, फूड, फॅशन, स्किनकेअर, DIY अशा विविध विषयांवर व्हिडीओ बनवत तब्बल 10 लाख स्बस्क्राइबर्सचा टप्पा पार केला आहे. या दुसऱ्या भागात सबस्क्राइबर्सच्या प्रश्नांची उत्तरे, ट्रोलिंग आणि कौतुकाच्या आठवणी, या सगळ्याविषयी उर्मिला सुकीर्त गप्पा मारणार आहेत. पुण्यातील डेटिंग स्पॉट्स ते युट्युबच्या पगाराच्या आठवणी सगळं काही या भागात पाहूया.
@UrmilaNimbalkar @SukirtG