गुजरातमधील मोरबी जिल्ह्यात एका पाच फूट लांबीच्या कोब्रा नागाला वाचवण्यात नागरिकांना यश आलं. राजेश पतारिया यांनी न्यायालयाच्या परिसरात आपली कार पार्क केली होती. यावेळी कारच्या समोरील भागात (बॉनेट) कोब्रा नाग अडकल्याचं काही लोकांना दिसलं. त्यानंतर सर्पमित्रांना बोलवण्यात आलं. तब्बल दोन तासांच्या प्रयत्नानंतर नागाला बाहेर काढण्यात सर्पमित्रांना यश आलं. त्यानंतर सुटका करण्यात आलेल्या नागाला जंगलात सोडण्यात आलं आहे.