पुण्यातील रमणबाग प्रशाला चौकामध्ये दुचाकी घसरल्यामुळे दुचाकीस्वार रस्ता दुभाजकाला धडकून गंभीर जखमी झाला. याचवेळी भरधाव जीप समोरून येत होती. पण, जीप चालकाने प्रसंगावधान राखत जीप बाजूला घेतल्यामुळे दुचाकीस्वाराचा जीव वाचला. या घटनेचे सीसीटीव्ही फुटेज व्हायरल झाले आहे.