अमेरिकेचे राष्ट्रपती डोनाल्ड ट्रम्प यांचा देशात दौरा सुरु असताना दिल्लीत दंगल होतेच कशी? हे सर्वोतोपरी केंद्राच्या गृहमंत्रालयाचं अपयश आहे. गृहमंत्री अमित शाह यांना जर हे जमत नसेल तर त्यांनी राजीनामा द्यावा, अशी मागणी खासदार सु्प्रिया सुळे यांनी पुण्यात आयोजित पत्रकार परिषदेत बोलताना केली.