वांद्रे : मोफत असलेली श्रमिक ट्रेन पकडण्यासाठी वांद्रे रेल्वे स्थानकाबाहेर स्थलांतरित कामगारांनी मंगळवारी एकच गर्दी केली. या गर्दीमुळं इथे काही काळ कायदा-सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाला होता. मात्र, काही वेळानंतर पोलिसांना ही गर्दी पांगवण्यात यश आले. त्यानंतर ज्या लोकांनी या ट्रेनसाठी नोंदणी केली होती, त्यांनाच ट्रेनमध्ये प्रवेश देण्यात आला.