पुणे शहर आणि जिल्ह्याला बुधवारी दुपारपासून पावसाने चांगलंच झोडपून काढलं. जोरदार पावसामुळे अनेक ठिकाणी पाणी साचलं होतं. आणखी दोन दिवस असाच मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता पुणे वेधशाळेकडून व्यक्त करण्यात आली आहे. यामुळे नागरिकांना सतर्क राहण्याचे आवाहन देखील करण्यात आलं आहे.