विद्यार्थ्यांच्या विविध मागण्यांसाठी आज अभाविप अर्थात अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेने जोरदार घोषणाबाजी करत पुणे विद्यापीठात आंदोलन केलं. या आंदोलनात पोलिसांनाही हस्तक्षेप करावा लागला. विद्यार्थ्यांच्या डिग्री, डिप्लोमासंदर्भातल्या प्रश्नांवर विद्यापीठाने उत्तर द्यावं अशी भूमिका अभाविपने घेतली होती.