भाजी खरेदीसाठी सकाळी ७ ते ११ वेळ असतानाही अनेक पिंपरी-चिंचवडकर टाइमपास म्हणून भाजी मंडईत फिरत चकरा मारत असतात. या अशा विनाकारण भाजी मंडईत फिरणाऱ्या नागरिकांवर पिंपरी-चिंचवड पोलीस लक्ष ठेवणार आहेत. जर कोणी विनाकारण फिरताना आढळलं तर त्याला थेट पाचशे रुपयांचा दंड भरावा लागणार आहे.