Uday Samant: ‘रिफायनरीला विरोध करणारे…’ रिफायनरीबाबत शरद पवारांच्या भेटीनंतर सामंतांची प्रतिक्रिया
रत्नागिरीतल्या राजापूरमधील बारसू येथील प्रस्तावित रिफायनरीवरून मोठा वाद सुरू झाला आहे. प्रकल्पाच्या माती परीक्षणाला स्थानिकांचा विरोध सुरू आहे. हा विरोध पोलीस बळाचा वापर करून मोडून काढत मंगळवारी ड्रिलिंगचे काम सुरू करण्यात आले. यावेळी पोलिसांनी ११० आंदोलकांना ताब्यातही घेतले. दरम्यान, याचे तीव्र पडसाद आता राजकीय वर्तुळात उमटताना दिसून येत आहे. शिवसेनेचा ठाकरे गट आणि शिंदे गट यावरून एकमेकांवर आरोप प्रत्यारोप करत असताना आज (२६ एप्रिल) उद्योगमंत्री उदय सामंत यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे सर्वेसर्वा शरद पवार यांची भेट घेतली.