‘बाप कधी जबाबदारीतून मुक्त होतो का?’; स्वतःच्या रक्ताने पत्र लिहीत कार्यकर्त्याचा शरद पवारांना सवाल
राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांनी काल राष्ट्रवादी पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष पदातून निवृत्त होण्याची घोषणा केल्यानंतर राज्यासह देशातील पदाधिकाऱ्यांना हा एक धक्का बसला आहे. चोपडा तालुक्यातील बुधगाव येथे राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसचे जिल्हा सरचिटणीस उर्वेश साळुंखे यांनी आपल्या स्वतःच्या रक्ताचे पत्र लिहिले आहे. त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते शरद पवार यांना आपण घेतलेला निर्णय मागे घ्यावा अशी विनंती या रक्ताने लिहिलेल्या पत्रातून केलेली आहे. ‘बाप कधी जबाबदारीतून मुक्त होतो का?’ असा सवाल विचारत आम्हाला भक्कम आधारवडाची गरज असल्याची भावना या पत्रातून साहेबांपर्यंत पोहचवून साहेबांनी घेतलेला निर्णय मागे घ्यावा, अशी विनंती राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसचे जिल्हा सरचिटणीस उर्वेश साळुंखे यांनी केली आहे