राष्ट्रवादीचे नेते आणि राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार हे काही आमदारांसह भाजपा आणि शिंदे सरकारमध्ये सामील झाले आहेत. यामुळे शिंदे आणि भाजपाच्या आमदार, खासदारांमध्ये अस्वस्थता निर्माण झालेली आहे. असं असताना २०१९ मध्ये लोकसभेच्या निवडणुकीत अजित पवार यांचे पुत्र पार्थ पवार यांचा पराभव करणारे शिवसेनेचे (शिंदे गटाचे) विद्यमान खासदार श्रीरंग बारणे यांनी मात्र अजित पवार हे आमच्या सरकारमध्ये सामील झाल्याने महायुतीची ताकद वाढल्याचं त्यांनी म्हटल आहे. तसेच २०२४ मध्ये होणाऱ्या मावळ लोकसभेच्या उमेदवारीवर पुन्हा एकदा दावा केला आहे. ते पिंपरी- चिंचवडमध्ये प्रसारमाध्यमांशी बोलत होते.