Sanjay Raut on Nitin Desai: ‘…मग नितीन देसाईंना वेगळा न्याय का?’; संजय राऊतांचा भाजपावर हल्लाबोल
अभिनेता आणि भाजपा खासदार सनी देओल यांच्या बंगल्याच्या लिलाव होणार असल्याचे गेल्या आठवड्यात समोर आले असताना काही तासात बँक ऑफ बडोदाने हा लिलाव रद्द केल्याचे सांगितले. दरम्यान या विषयावरुन ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी पत्रकार परिषदेतून भाजपावर हल्लाबोल केला. दिवंगत कला दिग्दर्शक नितीन देसाई यांच्यासोबत काय घडले, याची आठवण करुन देत सनी देओल यांच्या बंगल्याच्या विषयावर टीका केली.