पाच राज्यांच्या विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे राजस्थान दौऱ्यावर होते. तिथे शिवसेनेच्या उमेदवाराऐवजी भाजपाचा प्रचार त्यांनी केला. या संदर्भातील प्रश्न विचारला असता आदित्य ठाकरेंनी शिंदेंना मिश्कील टोला लगावला आहे. तसंच पोस्टरवरील हिंदुहृदयसम्राट उल्लेखावरूनही त्यांनी टीकास्त्र डागलं.