Jayant Patil on Devendra Fadnavis Letter: फडणवीसांच्या लेटरबॅाम्बवर जयंत पाटलांचा टोला
राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते नवाब मलिक यांच्यामुळे सध्या महायुतीत सर्वकाही आलबेल नसल्याचं चित्र समोर आलं आहे. नवाब मलिक अधिवेशनात सत्ताधारी बाकावर बसले आणि विरोधकांनी महायुतीला घेरलं. त्यावर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी नवाब मलिकांच्या उपस्थितीवरून अजित पवारांना पत्र लिहित ते थेट सोशल मीडियावर पोस्ट केलं. दोन्ही उपमुख्यमंत्र्यांच्या या विसंवादावरून राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार (शरद पवार गट) जयंत पाटील यांनी फडणवीसांना टोला लगावला आहे.