Rohit Pawar on Ajit Pawar: निवडणुकीवरून रोहित पवारांचं भाकित, अजित पवार गटाला टोला
केवळ शिंदे गट नव्हे तर अजित पवार गटातील नेत्यांनाही भाजपाच्या चिन्हावर निवडणूक लढावी लागेल, असं विधान आमदार रोहित पवारांनी केलं आहे. यासह अजित पवार यांनी विधानसभेत पीएच डी धारकांविषयी केलेल्या विधानाचाही रोहित पवारांनी निषेध व्यक्त केला. विधानभवनाबाहेर ते प्रसार माध्यमांशी बोलत होते.