अजित पवार राष्ट्रवादीतील इतर ८ सहकाऱ्यांना बरोबर घेऊन शिंदे-फडणवीस सरकारमध्ये सहभागी झाले. स्वत: अजित पवारांनी उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली, तर इतर आठ जण कॅबिनेट मंत्रिपदाची शपथ घेतली. यानंतर राष्ट्रवादी पक्षही अजित पवारांनाच मिळाला. यावर शरद पवार गटाच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी प्रतिक्रिया दिली आहे. “आमचं सव्वाशे जणांचं कुटुंब एखाद्या व्यक्तीने वेगळी भूमिका घेतली म्हणून कुटुंबात फुट पडली असे होत नाही” असंही सुळे म्हणाल्या आहेत.
 
   
   
   
  







 
  
  
  
  
  
  
  
  
  
  
  
 











 
  
  
  
  
  
  
  
  
   
   
  