बारामतीत होणाऱ्या लढतीकडे अवघ्या राजकीय वर्तुळाचं लक्ष लागलेलं आहे. सुनेत्रा पवार विरुद्ध सुप्रिया सुळे असा हा सामना रंगणार आहे. मात्र खरंतर ही कसोटी दोन्ही पवार कुटुंबाचीच आहे. या पार्श्वभूमीवर राज्यातील सत्ताधारी पक्षांकडून केल्या जाणाऱ्या वक्तव्यांचा शिवसेनेच्या उपनेत्या सुषमा अंधारे यांनी समाचार घेतला आहे. आपल्या एक्स अकाऊंटवर त्यांनी या संदर्भातील व्हिडीओ पोस्ट केला आहे.