पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या संकटकाळात त्यांच्या पाठीशी ठामपणे उभ्या राहिलेल्या शिवसेनेला नकली शिवसेना म्हणणारे उद्या राष्ट्रीय स्वयंसेवक संघालाही ‘नकली संघ’ म्हणण्यास कमी करणार नाहीत, अशी बोचरी टीका शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी शुक्रवारी (१७ मे) भाजपवर केली. ‘लोकसत्ता लोकसंवाद’ कार्यक्रमात उद्धव ठाकरे बोलत होते.