हरियाणातील पंचकुला या ठिकाणी एक धक्कादायक घटना घडली आहे. एका कारमध्ये सात जणांचे मृतदेह आढळून आले आहेत. हे सातही जण एकाच कुटुंबातील सदस्य होते. या सात जणांनी विष घेऊन आत्महत्या केली, अशी माहिती पोलिसांनी दिली. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, हे कुटुंब देहरादून येथील आहे. कर्जाचा डोंगर वाढू लागल्याने कुटुंबाने सामूहिक आत्महत्या केल्याची माहिती आहे.