अहमदाबाद : गुजरात पोलिसांनी एक आदर्श भाजी बाजाराची संकल्पना मांडली आहे. रामोल पोलीस ठाण्याच्या अंतर्गत सहा ठिकाणी पोलिसांनी हा प्रयोग केला आहे. या बाजारात फिजिकल डिस्टंसिंगचं काटेकोरपणे पालन, भाजी विक्रेत्यांचं पोलीस अधिकाऱ्यांकडून दररोज स्क्रिनिंग केलं जात. इथल्या भाजी विक्रेत्यांना मास्क, सॅनिटायझर आणि ग्लोव्ह्ज देखील पोलिसांनी उपलब्ध करुन दिले आहेत. त्याचबरोबर त्यांच तपामान देखील थर्मामीटर गनद्वारे तपासलं जातं.