काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेस आणि भाजप-शिवसेनाला पर्याय म्हणून उभ्या केलेल्या भारिप-बहुजन महासंघ व डाव्या आघाडीत जागा वाटपावरुन ताणाताणी सुरु झाली आहे. शुक्रवारी झालेल्या बैठकीत जागावाटपावर काही तोडगा निघाला नाही. आता पुन्हा येत्या सोमवारी बैठक होणार आहे. ज्या पक्षाची ज्या जिल्ह्यात ताकद आहे, त्यांनी त्या जिल्हात सर्वाधिक उमेदवार द्यावेत आणि इतर पक्षांनी त्यांना पाठिंबा द्यावा, या भारिपचे नेते प्रकाश आंबेडकर यांच्या सूत्रानुसार जागावाटपावर तोडगा काढण्याचा प्रयत्न केला जाणार आहे. येत्या सोमवारी होणाऱ्या बैठकीत त्यावर चर्चा होऊन सर्वमान्य तोडगा निघेल, अशी अपेक्षा आंबेडकर यांनी लोकसत्ताशी बोलताना व्यक्त केली.