ओदिशातील नयागड शाही कुटुंबातील सदस्य आणि बीजेडीचे खासदार हेमेंद्र सिंह यांचे शुक्रवारी पहाटे येथे एका खासगी रुग्णालयात निधन झाले. ते ४६ वर्षांचे होते. छातीत दुखू लागल्याने गेल्या शनिवारी त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. त्यांना श्वसनाचाही त्रास होत होता. गुरुवारी त्यांची प्रकृती अधिकच खालावली आणि शुक्रवारी पहाटे त्यांचे निधन झाले. त्यांच्या पश्चात पत्नी, एक पुत्र आणि एक कन्या असा परिवार आहे. ओदिशातील कंधमाळ लोकसभा मतदारसंघातून ते विजयी झाले होते. फेब्रुवारी महिन्यांत त्यांनी काँग्रेस सोडून बीजेडीमध्ये प्रवेश केला होता.
लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
First Published on September 6, 2014 3:42 am