माजी आमदार राजन तेली यांनीही उद्योगमंत्री नारायण राणे यांच्यापासून बाजूला जात सावंतवाडी विधानसभा मतदार संघातून निवडणूक लढविण्याची जय्यत तयारी चालविली आहे. राजन तेली यांनी जिल्हा बँक अध्यक्षपदाचा राजीनामाही दिला आहे.
नारायण राणे यांचे डावे-उजवे म्हणून राजन तेली आणि परशुराम उपरकर ओळखले जायचे. उपरकर यांनी राणे यांच्यापासून फारकत घेतल्यास बराच काळ लोटला आहे. स्वाभीमान संघटना अध्यक्ष नितेश राणे यांच्यामुळे राजन तेली लोकसभा निवडणूकीनंतर राणे यांच्यापासून दूर झाले आहेत.
राजन तेली कणकवली मुक्काम सोडून थेट सावंतवाडी मतदार संघ कार्यक्षेत्र निवड करत मतदार संघात जोरदार प्रचारास सुरुवात केली आहे. गेली वीस वर्षे आपण सावंतवाडी मतदार संघात कार्यरत असून विधानसभा निवडणूकीत रिंगणात राहणार असल्याचे तेली यांनी सांगितले आहे.
सावंतवाडी विधानसभा मतदारसंघातून प्रसंगी अपक्ष निवडणूक लढविणार असल्याचे राजन तेली यांनी म्हटले आहे. मात्र त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाशी नाळ जुळवीण्याचा प्रयत्न चालविला असल्याची चर्चा आहे. नारायण राणे यांच्यावर आपण बोलणार नसल्याचे राजन तेली यांनी सांगितले आहे. मात्र स्वाभीमान अध्यक्ष नितेश राणे यांच्यामुळेच आपण राणे यांच्यापासून दूर गेल्याचे दु:ख त्यांना आहे. त्यांनी राणेंची स्टाईल माहित असल्याने अतिशय दक्षता पूर्वक निवडणुकीची तयारी चालविली आहे.
नारायण राणे यांचे खंदे समर्थक म्हणून ओळखले जामारे राजन तेली, काका कुडाळकर यांनी राणे यांच्यापासून चार पावले दूर राहत राजकारण करण्याचा निर्णय घेतला आहे असे सांगण्यात आले.

Narayan Rane, Vinayak Raut,
रत्नागिरी-सिंधुदुर्गमध्ये ‘कडवट’ माजी-आजी शिवसैनिकांमध्ये लढत
Tanaji Sawant, Archana Patil, Tanaji Sawant silence,
अर्चना पाटील उमेदवारीनंतर समर्थकांच्या आंदोलनावर आरोग्यमंत्री तानाजी सावंत यांचे मौन
Devendra Fadnavis said We have to work with those who have struggled so far
“आतापर्यंत संघर्ष केलेल्यांसोबत काम करावे लागेल”, देवेंद्र फडणवीस यांची स्पष्टोक्ती; इंदापूरचे पालकत्व स्वीकारले
Nominate BJP for Dharashiv Delegation demands to Devendra Fadnavis
धाराशिवसाठी भाजपालाच उमेदवारी द्या! शिष्टमंडळाची फडणवीस यांच्याकडे मागणी