News Flash

निवडणूक आयोगाने ठाकरे बंधुंना संपत्ती जाहीर करण्याचे आदेश द्यावेत

निवडणूक आयोगाकडून शिवसेनाप्रमुख उद्धव ठाकरे, त्यांचे पूत्र आदित्य ठाकरे आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे (मनसे) अध्यक्ष राज ठाकरे यांना संपत्ती जाहीर करण्याचे आदेश देण्यात यावेत, यासाठी

| October 13, 2014 09:48 am

निवडणूक आयोगाने ठाकरे बंधुंना संपत्ती जाहीर करण्याचे आदेश द्यावेत

निवडणूक आयोगाकडून शिवसेनाप्रमुख उद्धव ठाकरे, त्यांचे पूत्र आदित्य ठाकरे आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे (मनसे) अध्यक्ष राज ठाकरे यांना संपत्ती जाहीर करण्याचे आदेश देण्यात यावेत, यासाठी सोमवारी मुंबई उच्च न्यायालयात जनहित याचिका दाखल करण्यात आली. न्यायालयाने निवडणूक आयोगाला निर्देश देऊन ठाकरे बंधुंना प्रतिज्ञापत्राद्वारे संपत्ती जाहीर करण्याचे आदेश देण्याची मागणी या याचिकेद्वारे करण्यात आली आहे.  ठाकरे बंधु निवडणूक लढवत नसले तरी त्यांच्या राजकीय पक्षाकडून निवडणुकीसाठी उमेदवार उभे करण्यात आले आहेत. त्यामुळे उमेदवारांप्रमाणे त्यांनीदेखील स्वत:ची संपत्ती जाहीर केली पाहिजे, असे याचिकेत म्हटले आहे. ठाणे शहरातील श्रीप्रकाश नील यांच्याकडून दाखल करण्यात आलेल्या याचिकेत फक्त ठाकरे कुटुंबातील नावांचा समावेश असला तरी, सर्वच राजकीय पक्षाच्या प्रमुखांनी त्यांची संपत्ती जाहीर करावी असे म्हणण्यात आले आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on October 13, 2014 9:48 am

Web Title: pil demands disclosure of assets by thackerays other leaders
टॅग : Pil
Next Stories
1 सोलापूरात काँग्रेसच्या नेत्याला पैसे वाटताना अटक
2 महाराष्ट्रात १३ दिवसांत ७१५ प्रचारसभा! गडकरींनी घेतल्या सर्वाधिक १०४ सभा
3 शिवसेनेला कंटाळलो होतो!
Just Now!
X