News Flash

रामदास आठवले भाजपसोबतच!

रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे (रिपाई) अध्यक्ष रामदास आठवले यांनी शनिवारी भाजपच्याच गोटात राहण्याचा निर्णय घेतला.

| September 27, 2014 06:49 am

रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे (रिपाई) अध्यक्ष रामदास आठवले यांनी शनिवारी भाजपच्याच गोटात राहण्याचा निर्णय घेतला. भाजपकडून केंद्रात मंत्रिपद, राज्यातील सत्तेत १० टक्के वाटा आणि काही महामंडळे देण्याचे आश्वासन मिळाल्यावर भाजपसोबत जाण्याचा निर्णय आठवले यांनी घेतला. रिपाईच्या समावेशामुळे आता भाजपप्रणित महायुतीत राजू शेट्टी यांचा स्वाभिमानी पक्ष, महादेव जानकर यांचा रासप आणि विनायक मेटे यांच्या शिवसंग्राम अशा एकुण पाच पक्षांचा समावेश असणार आहे. भाजपकडून रिपाईला आठ जागा सोडण्यात आल्या आहेत.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on September 27, 2014 6:49 am

Web Title: ramdas athawale to stay with bjp alliance
टॅग : Bjp,Ramdas Athawale,Rpi
Next Stories
1 रामदास आठवले भाजपसोबत; केंद्रात मंत्रिपदाचे आश्वासन
2 ठाण्यात शिवसेनेला धक्का; अनंत तरे अपक्ष लढणार
3 फुटीनंतर..शिवसेना एकाकी?
Just Now!
X