मतदारांना कार्यकर्त्यांमार्फत पैशाचे वाटप केल्याने गंगाखेड विधानसभा मतदारसंघातील अपक्ष उमेदवार आमदार सीताराम घनदाट व ‘राष्ट्रीय समाज पक्षा’चे उमेदवार उद्योजक रत्नाकर गुट्टे यांना रविवारी पोलिसांनी अटक केली. गंगाखेड विधानसभा मतदारसंघातील ‘अर्थ’पूर्ण प्रचाराबाबत ‘लोकसत्ता’ने रविवारीच वृत्त प्रसिद्धीस देऊन या प्रकरणी जिल्हा प्रशासन दुर्लक्ष करीत असल्याचे स्पष्ट केले होते. प्रशासनाने खडबडून जागे होत या मतदारसंघात पसेवाटप प्रकरणावर आता करडी नजर ठेवली आहे.
रविववारी पहाटे घनदाट यांना पालम येथे तर गुट्टे यांना दुपारी साडेचार वाजता पूर्णा येथे पोलिसांनी अटक केली. घनदाट यांच्या घराची तर गुट्टे यांच्या साखर कारखाना व गंगाखेडमधील कार्यालयाची झडती घेण्यात आली. तांदुळवाडी येथे  गुरुवारी एका अपक्ष उमेदवाराचे पसे वाटप चालू असताना भरारी  पथक गावात पोहचले. या प्रकरणी पोलीस चौघांना अटक केली. या प्रकरणाचा तपास करीत असताना पोलिसांना या कृत्यात अपक्ष उमेदवार आ. सीताराम घनदाट यांचाही अप्रत्यक्ष सहभाग असल्याचे निष्पन्न झाले. त्याशिवाय खळी येथेही मतदारांना पसे वाटप होत असल्याचा प्रकार शनिवारी उघडकीस आला होता. या प्रकरणी उद्योजक गुट्टे यांना अटक केली.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
मराठीतील सर्व विधानसभा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Sitaram ghandat ratnakar gutte arrested for money distribution
First published on: 06-10-2014 at 04:13 IST