नोव्हेंबर ०८  २०१६

* बाद झालेल्या नोटा ३० नोव्हेंबपर्यंत बँकांमध्ये जमा करण्याची मुभा. मात्र, एका व्यक्तिला ४ हजार रुपयांच्याच नोटा बदलण्याची परवानगी.

* २४ नोव्हेंबपर्यंत दररोज केवळ दहा हजार रुपये आणि आठवडय़ाला एकूण २० हजार रुपये काढण्याची मुभा. १८ नोव्हेंबपर्यंत दररोज कार्डद्वारे २००० रुपये काढण्याची मुभा.

* १९ नोव्हेंबरनंतर दररोज प्रत्येक एटीएम कार्डद्वारे ४००० रुपये काढण्याची मुभा. पेट्रोल पंपावर बाद नोटा स्वीकारण्याच्या सूचना.

९ नोव्हेंबर

* निश्चलनीकरणाच्या प्रक्रियेसाठी एक दिवस बँका व एटीएम केंद्रे बंद.

* ११ नोव्हेंबरच्या मध्यरात्रीपर्यंत देशभरात टोलनाके बंद. रात्री आठ वाजेपर्यंत बँका सुरू ठेवण्याची घोषणा.

१० नोव्हेंबर

बँका सुरू झाल्यानंतर नोटाबदलीसाठी, भरण्यासाठी लांबच लांब रांगा. एटीएम केंद्रे बंदच.

११ नोव्हेंबर

* एटीएम केंद्रे सुरू; मात्र रोकड काढण्यासाठी झुंबड उडाल्याने काही तासांतच एटीएममध्ये खडखडाट.

* ५०० आणि १००० रुपयांच्या जुन्या नोटांबाबतच्या सवलती केंद्र सरकारने १४ नोव्हेंबपर्यंत वाढवल्या. टोलबंदीची मुदतही १४ नोव्हेंबपर्यंत वाढवण्यात आली.

१२ नोव्हेंबर

* बँकांसमोर भल्यामोठय़ा रांगा आणि एटीएम केंद्रे बंद असल्याने रोकडअभावी नागरिकांचे हाल. सर्वसामान्यांतून तीव्र रोष.

१३ नोव्हेंबर

* बँका रविवारीही खुल्या. मात्र, रोकडटंचाई कायम. रिझव्‍‌र्ह बँकेकडून पुन्हा एकदा पुरेशी रोकड असल्याचा दावा.

* बँकांमधून नोटाबदलीची मर्यादा आता ४००० वरून ४५०० रुपये करण्यात आली.

* बँकांमधून पैसे काढण्याची साप्ताहिक मर्यादा २० हजारांवरून २४ हजारांवर.

* एटीएममधून  एका वेळी अडीच हजार रुपये काढण्याची मुभा.

१४ नोव्हेंबर

* सरकारी कार्यालये आणि पेट्रोल पंप येथे बाद झालेल्या ५०० व १००० रुपयांच्या नोटा स्वीकारण्याची मुदत २४ नोव्हेंबपर्यंत वाढवण्यात आली.

* गुरू नानक जयंतीनिमित्त बँका बंद. त्यामुळे एटीएम केंद्रांवर लांबच लांब रांगा.

* चालू खात्यातून दर आठवडय़ाला ५०,००० रुपये काढण्याची मुभा.

* एटीएम व्यवहारांतील शुल्क ३० डिसेंबपर्यंत माफ करण्यात आले.

१५ नोव्हेंबर

* ५०० आणि १००० रुपयांच्या बाद झालेल्या नोटा बदलण्यासाठी आलेल्यांच्या उजव्या हाताच्या बोटाला विशिष्ट प्रकारची शाई लावण्यात यावी, असे सरकारचे बँकांना आदेश.

* केंद्र सरकारला नोटाबंदीचा निर्णय मागे घ्यायला लावण्यास सर्वोच्च न्यायालयाचा नकार.

१६ नोव्हेंबर

* बँकांमध्ये चलन तुटवडा कायम. एटीएम केंद्राबाहेर रांगा पण रोकड नाहीच.

* स्टेट बँकने गेल्या ७ दिवसांत १,१४,१३९ कोटी रुपये जमा केले.

१७ नोव्हेंबर

* नोटाबदलीची मर्यादा ४५०० वरून २००० रुपयांवर. विवाह समारंभानिमित्त बँकेच्या खात्यातून २.५ लाख रुपये काढण्यास परवानगी.

* पिक कर्जानिमित्त शेतकऱ्यांना आठवडाभरात २५,००० रुपये काढण्याची मुभा.

* शेतकऱ्यांसाठी पिकविम्याचे शुल्क भरण्याची मुदत १४ दिवसांनी वाढवण्यात आली.

* राष्ट्रीय महामार्गावरील २४ नोव्हेंबपर्यंत टोलमाफी.

१८ नोव्हेंबर

* चलन तुटवडय़ामुळे जीडीपीच्या दरात ०.३ ते ०.५ टक्क्यांची घसरण.

* बँकांबाहेरील रांगा आणि निश्चलनीकरणामुळे झालेला त्रास यामुळे देशभरात ५५ नागरिकांचा मृत्यू झाल्याचा काँग्रेसचा आरोप.

* पंतप्रधानांनी देशाची माफीच्या मागणीवरून संसदेत गदारोळ कामकाज ठप्प.

१९ नोव्हेंबर

* बँकासमोरील रांगा घटल्या. एटीएम केंद्रांसमोर मात्र लांब रांगा कायम.

२१ नोव्हेंबर

* बियाणे खरेदीसाठी शेतकऱ्यांना ५०० रुपयांच्या बाद झालेल्या नोटा वापरण्यास मुभा.

* १३ दिवसांत बँकांमध्ये ५.१२ लाख कोटी जमा झाल्याचे व ३३,००६ कोटी रुपयांच्या नोटा बदलून दिल्याचे रिझव्‍‌र्ह बँकेकडून जाहीर.

२२ नोव्हेंबर

देशभरातील ८२,५०० एटीएम यंत्रांमध्ये खडखडाट. २.२ लाख एटीएम यंत्रांमध्ये नव्या नोटांचे प्रमाण कमी. केवळ ४० टक्के एटीएम यंत्रांमधूनच नव्या नोटा मिळत असल्याचे चित्र.

२३ नोव्हेंबर

* चलन तुटवडय़ामुळे जीडीपीचा दर ६.८ टक्क्यांवर आला आहे, असा अंदाज ‘गोल्डमॅन सॅक’ने वर्तवला.

* स्टेट बँकेने १.२० कोटी रुपयांच्या बाद नोटा जमा केल्या.

२४ नोव्हेंबर

* राष्ट्रीय महामार्गावरील टोलमाफीची मुदत २ डिसेंबरच्या मध्यरात्रीपर्यंत वाढवण्यात आली.

* बाद झालेल्या नोटा बदलण्याची प्रक्रिया सरकारने बंद केली. केवळ बँकामध्ये जमा करण्यास मुभा.

* बाद झालेल्या नोटा टोलनाके, सार्वजनिक रुग्णालये यांमध्ये वापरण्यास मुभा.

२५ नोव्हेंबर

रिझव्‍‌र्ह बँकेच्या शाखांमध्येही बाद झालेल्या नोटा बदल्याची सुविधा.

२६ नोव्हेंबर

नोटबंदीच्या निर्णयानंतर १४ दिवसांत जनधन बँकखात्यात २७,२०० कोटी ते ७२,८३४.७२ कोटी रुपये जमा.

२७ नोव्हेंबर

देशभरातील टपाल कार्यालयांमध्ये ३२,६३१ कोटी रुपये जमा.

२८ नोव्हेंबर

तीन आठवडय़ांत बँकांमध्ये ८.४५ लाख कोटी रुपयांच्या बाद नोटा जमा झाल्याचे रिझव्‍‌र्ह बँकेकडून जाहीर.

३० नोव्हेंबर

जनधन खात्यातून महिन्याला १०,००० रुपये काढण्याची मर्यादा. बँका, एटीएम केंद्रांबाहेरील रांगा घटल्या.

१ डिसेंबर

इंधनखरेदी, विमान तिकीट यांसाठी 5०० रुपयांच्या जुन्या नोटा केवळ २ डिसेंबपर्यंतच चालतील, असे सरकारने जाहीर केले. याआधी ही मुदत १५ डिसेंबपर्यंत देण्यात आली होती. १.८० लाख एटीएम यंत्रांमध्ये नव्या ५०० आणि २०००च्या नोटा वितरित.

२ डिसेंबर

निश्चलनीकरण व चलन तुटवडय़ामुळे जीडीपी ६.८ टक्क्यांवर घसरल्याचा अंदाज.

३ डिसेंबर

टोलनाक्यांवर पुन्हा टोल घेणे सुरू.

६ डिसेंबर

महिनाभरात कर विभागाकडून १३० कोटींची रक्कम, दागिने आणि बेहिशोबी संपत्ती जप्त.

७ डिसेंबर

रिझव्‍‌र्ह बँकेकडून नोटबंदीचे समर्थन. अर्थव्यवस्थेवर परिणाम झाला नसल्याचा दावा. जीडीपीवर केवळ ०.१५ टक्क्यांचा फरक पडल्याचे स्पष्टीकरण.  ११.५५ लाख कोटी रुपयांच्या म्हणजे ७६ टक्के बेहिशोबी नोटा जमा झाल्याचे म्हणणे.