डॉ.विलास डांगरे

अटलजींच्या आठवणी माझ्या जीवनातील एक मोठा ठेवा आहे. त्या सांगायच्या म्हणजे कुठून सुरुवात करावी प्रश्नच आहे. पण, त्यांची पहिली मला आजही लख्ख आठवतेय. शालेय शिक्षण सुरू असतानाच मी संघाची जबाबदारी सांभाळत होतो आणि त्याच वेळी जनसंघाचे कामही करीत होतो. वैद्यकीय शिक्षण पूर्ण करून  वैद्यकीय सेवेचा मार्ग पत्करल्यावर भाजपाचे ज्येष्ठ नेते अटलबिहारी बाजपेयी एका बैठकीच्या निमित्ताने रेशीमबागेतील स्मृती भवन परिसरात आले होते. त्या वेळी मी प्रबंधक म्हणून अटलजींच्या सेवेत होतो. ते एक दिवस येथे थांबले. त्यामुळे त्यांची ओळख झाली आणि ते मला नावाने ओळखू लागले. देशात आणीबाणी लागली असताना अटलजी विदर्भात आले. तेव्हा त्यांना विविध ठिकाणी घेऊन जाण्याची जबाबदारी नितीन गडकरी आणि माझ्यावर होती. त्यामुळे त्यांच्याशी मोकळा संवाद होत असे.

Sarbajeet singh
सरबजित सिंगच्या मारेकऱ्याची पाकिस्तानात हत्या; मुलगी म्हणते, “हा न्याय…”
sharad pawar
धमक्यांना घाबरू नका, ‘त्यांना’ दुरुस्त करण्याची वेळ; शरद पवार यांचे अजित पवारांना थेट आव्हान
Pune, Woman, Commits Suicide, Over Property Dispute, Case Registered, Brother, Relatives, police, crime news, marathi news,
पुणे : संपत्तीच्या वादातून महिलेची गळफास घेऊन आत्महत्या; सख्या भावासह नातेवाईकांविरुद्ध गुन्हा
Boy killed for resisting unnatural act Sheel Daighar police arrests two
अनैसर्गिक कृत्यास विरोध केल्याने मुलाची हत्या, शीळ डायघर पोलिसांनी केली दोघांना अटक

एक घटना मला लख्खपणे आठवते. स्मृती भवन परिसरात ७७-७८ च्या दरम्यान अटलजी देवनगरात राहणाऱ्या भाचीकडे एका कार्यक्रमाच्या निमित्ताने आले होते. त्या वेळी डॉ. रजनी रॉय या त्यांच्यासोबत असल्यामुळे आणि त्या माझ्याकडून औषध घेत असल्यामुळे त्यांनी एका कार्यकर्त्यांची भेट करून देतो, असे सांगून अटलजींना माझ्या दवाखान्यात आणले. मात्र अटलजी मला नावाने ओळखत होते. अटलजी आल्याचे कळताच मी बाहेर आलो आणि त्यांना नमस्कार केला. वैद्यकीय सेवा देण्याचे काम हे पुण्याचे काम आहे. ते असेच करीत राहा असा आशीर्वाद त्यांनी दिला. त्यानंतर ८४ -८५ च्या दरम्यान नागपुरात कडक ऊन होते. संघ शिक्षा वर्गाच्या निमित्ताने ते स्मृती भवन परिसरात आले. त्या वेळी मी तिथेच प्रबंधक म्हणून सेवेत होतो.

अटलजी आल्यानंतर त्यांचे सामान खोलीत नेऊन ठेवले. त्यांना उन्हाचा त्रास झाला होता, त्यामुळे ते अस्वस्थ होते. तत्कालीन सरसंघचालक सुदर्शनजी त्यांच्यासोबत ते बसले होते. सुदर्शनजींनी मला आत बोलविले. अटलजींनी मला ओळखले. अटलजींना त्रास होत असल्यामुळे ते अस्वस्थ होते. मला औषध देण्यासाठी सांगितले. मी त्यांना तपासले, रुग्णालयात जाऊन औषध घेऊन आलो आणि त्यांना दिले. पंतप्रधान झाल्यावर ते एकदा स्मृती मंदिरात आले होते.

त्या वेळी त्यांची भेट झाली. ते नियमित होमियोपॅथी औषधे घेत नसले तरी नागपुरात आले की औषध घेऊन जात होते किंवा तेथून निरोप पाठवून मागून घेत होते. माझ्यासारखा शिकाऊ डॉक्टरवर त्यांनी विश्वास ठेवला होता. अटलीजींच्या  गुडघ्यावर शस्त्रक्रिया केली जाणार होती त्या वेळी खरेच त्याची आवश्यकता आहे का म्हणून त्यांची माझ्याकडे विचारपूस केली होती. त्या वेळी त्यांना पाहण्यासाठी दिल्लीला गेलो होतो. गेल्या दहा वर्षांत मात्र त्यांनी माझ्याकडून औषधे घेतली नाही. त्यांना भेटण्याची खूप इच्छा आहे, मात्र सध्या तशी परिस्थिती नसल्याचे मला सांगण्यात आले.

(डांगरे हे नागपुरातील प्रसिद्ध होमियोपॅथ असून वाजपेयींनी दीर्घकाळ त्यांच्याकडून उपचार घेतले आहेत. )