देशभरातून लक्षणीय कामगिरी करणाऱ्या निवडक तरुणांचा सन्मान करणाऱ्या ‘लोकसत्ता तरुण तेजांकित’ या पुरस्काराचे तिसरे पर्व गेल्या वर्षभराच्या प्रतीक्षेनंतर त्याच दिमाखात आणि नेटाने पार पडले. करोनाचे सावट असल्याने राज्य सरकारने घालून दिलेल्या मार्गदर्शक नियमांची चौकट या पुरस्कार सोहळ्याला असली तरी शिस्तीत पार पडलेल्या या सोहळ्यातले चैतन्य तसूभरही कमी झाले नाही.

जगभरात क रोनाने घातलेले थैमान, टाळेबंदीत अडकलेले दैनंदिन जीवन आणि टाळेबंदी शिथिल झाल्यानंतर पुन्हा आपापली घडी नीट बसवण्याच्या प्रयत्नात एक वर्ष भर्रकन निघून गेले. ४०० प्रज्ञावंत तरुणांच्या यादीतून २० तरुण तेजांकितांची निवड करण्यात आली होती. त्यांच्या सन्मानासाठी आयोजित के लेल्या ‘लोकसत्ता तरुण तेजांकित पुरस्कार’ सोहळ्याचा क्षण जवळ आला आणि त्याच वेळी करोनाचा संसर्ग वाढू नये म्हणून देशभरात टाळेबंदी जाहीर करण्यात आली. शनिवारी, २० मार्चला दीर्घ प्रतीक्षेनंतर हा सन्मान सोहळ्याचा क्षण पुन्हा जुळून आला. परेल येथील आयटीसी ग्रॅण्ड सेंट्रल हॉटेलमध्ये के ंद्रीय मंत्री प्रकाश जावडेकर यांच्या प्रमुख उपस्थितीत या तरुण तेजांकितांना पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले.

‘लोकसत्ता’च्या ‘तरुण तेजांकित पुरस्कार’ या उपक्रमाने अल्पावधीतच आपले वेगळेपण सिद्ध केले आहे. पहिल्याच पर्वात प्रसिद्ध झालेल्या या उपक्रमाच्या उद्दिष्टातच त्याची खरी सफलता आहे, याची जाणीव ‘लोकसत्ता’चे संपादक गिरीश कु बेर यांनी आपल्या प्रास्ताविकातून करून दिली. माध्यमांमधून एरव्ही दिले जाणारे पुरस्कार आणि त्यांचे स्वरूप यांचा एक साचा ठरून गेलेला आहे. तरुण तेजांकित पुरस्कार याला अपवाद ठरले आहेत. राज्यात, देशात अनेक तरुण आपापल्या स्तरावर वेगवेगळ्या पद्धतींचे काम करत आहेत. एखादी वैज्ञानिक तरुणी कडधान्यांवर सातत्याने प्रयोग करत त्यातील अन्नगुण शोधू पाहते आहे, नागपुरात एक तरुण हेल्मेट घातल्याशिवाय दुचाकी सुरूच होणार नाही अशी यंत्रणा विकसित करतो. प्रसिद्धीची किं वा सोयीसुविधांची-आर्थिक मदतीची तमा न बाळगता नवीन काही तरी शोधणाऱ्या तरुणांचा गौरव व्हायलाच हवा. त्यांचे कार्य लोकांसमोर यायला हवे, या उद्देशाने तरुण तेजांकित पुरस्कारांची मुहूर्तमेढ रोवली गेली, अशी माहिती गिरीश कु बेर यांनी दिली. गेली दोन वर्षे सातत्याने पार पडलेल्या या उपक्रमाचे तिसरे वर्ष करोनामुळे चौथ्या वर्षी पार पडते आहे, याची आठवण करून देत अत्यंत अवघड परिस्थितीतही हा सोहळा पार पडण्यासाठी प्रयत्न करणाऱ्यांचे त्यांनी आभार मानले.

प्रायोजक…

या उपक्रमासाठी महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळ (एमआयडीसी) हे मुख्य प्रायोजक होते. सारस्वत को-ऑपरेटिव्ह बँक लिमिटेड, वल्र्ड वेब सोल्यूशन्स, महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ, सिडको हे सहप्रायोजक होते. एम. के. घारे ज्वेलर्स पॉवर्ड बाय पार्टनर होते, तर प्राइस वॉटर हाऊस कुपर्स यांनी नॉलेज पार्टनर म्हणून काम पाहिले, तर टेलीव्हिजन पार्टनर म्हणून एबीपी माझाचे सहकार्य उपक्रमाला लाभले.