नाते बहीण भावाचे, प्रेम आणि विश्वासाचे. ‘भाऊबीज’ बहीण भावाच्या नातेसंबंधाचा धागा दृढ करणारा हा दिवस. यावेळच्या भाऊबीजेचा आनंद द्विगुणीत करण्याची संधी लोकसत्ता डॉट कॉम तुम्हाला देत आहे. तुमचे भाऊबीजेचे फोटो loksatta.express@gmail.com या ई-मेलवर पाठवा. सबजेक्टमध्ये ‘भाऊबीज!’ लिहिण्यास विसरू नका.
मेलमध्ये बहीण-भावाचे नाव आणि स्थळाचे नाव अवश्य लिहा. निवडक फोटोंचा अल्बम ‘लोकसत्ता डॉट कॉम’वर प्रसिद्ध केला जाईल. त्याचप्रमाणे या अल्बमची लिंक लोकसत्ताच्या फेसबुक पेजवरही शेअर केली जाईल. याशिवाय तुम्ही पाठविलेल्या फोटोंपैकी सर्वोत्कृष्ट फोटोला लोकसत्ताच्या फेसबुक पेजवर कव्हर फोटो होण्याची संधी मिळेल.